गडद पिंक विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - अमिताभ बच्चन, तापसी पन्नू, किर्ती कुलहारी, अँड्रिया टॅरिंग
  • निर्माता - रश्मि शर्मा टेलिफिल्म्स लि. दिग्दर्शक - अनिरुद्ध रॉय चौधरी
  • Duration - 2 तास Genre - सस्पेंस
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

गडद पिंक

जान्हवी सामंत 

'पिंक' हे नाव अतिशय दिशाभूल करणारे आहे. साधारणत: पिंक हा रंग खूप हलका, साधा, क्षुल्लक आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या नावावरून हा चित्रपटदेखील हलकाफुलका असावा असे वाटते. पण त्याच्या सादरीकरणात हा चित्रपट अतिशय ग्रे आणि गंभीर स्वरूपाचा बनला आहे. पिंक ही मिनल (तापसी पन्नू), फलक (किर्ती कुलहारी) आणि अँड्रिया (अँड्रिया टॅरिंग) या तीन मुलींची कथा आहे. ते पेईंग गेस्ट म्हणून एका घरात राहात असतात. एका हिंसक प्रसंगात ते ओढले जातात. त्यांची काही लोकांसोबत प्रचंड हाणामारी होते आणि त्यातील एकाला गंभीर दुखापत होते. पण यानंतर दोघेही पोलिसांमध्ये जाऊन याची तक्रार नोंदवत नाहीत. ज्यांच्यासोबत या मुलींची भांडणे होतात, त्या मुलांचे राजकीय नेत्यांशी संबंध खूप चांगले असतात. त्यामुळे या मुलींचा प्रचंड छळ केला जातो, दहशतीचे वातावरण निर्माण केले जाते. या घटनेनंतर त्यांनी घर सोडावे असा दबाब त्यांचा घरमालक त्यांच्यावर टाकतो. एका मुलीवर नोकरी सोडायलाही दबाव टाकला जातो. तर एका मुलीचा सतत पाठलाग केला जातो. तसेच तिचा विनयभंगही केला जातो. पोलिस त्यांची तक्रार घेण्यासाठीही तयार होत नाही. खऱ्या आयुष्यात मुलींचा छळ कसा होऊ शकतो हे या चित्रपटाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.या चित्रपटाच्या कथेत अनेक विसंगती आहेत. काही दृश्य तर आपल्या तर्काच्या खूपच पलीकडच्या आहेत. फलकच्या फोटोशोप केलेल्या फोटोंमुळे तिला तिची नोकरी सोडावी लागते ही गोष्ट न पटणारी आणि उगाचच चित्रपटात टाकल्यासारखी वाटते. मिनलचा विनयभंग होणे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. पण याची नंतरच्या कोणत्याच दृश्यात चर्चा होताना दिसत नाही की त्याचा संदर्भही नंतर चित्रपटात नाहीये. तसेच सुरुवातीच्या काही दृश्यांमध्ये बच्चन यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना संभ्रमित करणारी वाटते. अमिताभचे एका महिलेसोबत असलेले रहस्यमय नाते आणि त्याची मानसिक अवस्था या दोन्ही गोष्टींची चित्रपटात काहीच नाते जुळत नाही. मुलींचा सगळ्यांचा अभिनय अजून चांगला होऊ शकला असता. घाबरलेल्या मुलीचा अभिनय करणे हे तापसी पन्नूच्या अभिनय कुवतीच्या पलीकडे आहे. पण किर्तीचा अभिनय चांगला आहे. अँड्रिनाला चित्रपटात करण्यासारखे तसे काहीही नाहीये. अमिताभ यांनी नेहमी आपल्या विचारात मग्न असलेल्या वकिलाची भूमिका साकारली आहे. खरेतर ही भूमिका तीन या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसारखीच आहे. पण तीनच्या भूमिकेपेक्षा या चित्रपटात त्यांची भूमिका अधिक रेखीव आहे.चित्रपट पाहताना पुढे काय होणार आहे याची आधीच कल्पना येते. काही गोष्टी वगळल्या तर कथानकात आपण विचार केल्यापेक्षा काहीच वेगळ्या गोष्टी घडत नाहीत. चित्रपटात एक गंभीर नाट्यता खूप हुशारीने दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटात असलेल्या कमतरता नक्कीच भरून निघतात. वादविवाद कधी प्रमुख कलाकारांच्या बाजूचे वाटतात तर कधी त्यांच्या विरोधातील वाटतात. चित्रपटाचे पार्श्वसंगीत हे अतिशय उठावदार आणि गंभीरता टिकवून ठेवणारे आहे. या चित्रपटात मांडलेल्या मुद्द्यामुळे हा चित्रपट अधिक प्रभाव पाडतो. राहणीमान, दारू पिणे, उशिरा फिरणे, मनमौजीप्रमाणे वागणे या गोष्टी महिलांनी केल्यास आपल्या समाजात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. महिलांकडे त्यांचे कुटुंब, आर्थिक परिस्थिती आणि त्या कोणत्या प्रदेशातून आल्या आहेत यावरून त्यांच्याबद्दल मते बनवली जातात. पण पुरुषांनी तसे वागल्यास त्यांना मुक्त सोडून देण्यात येते. चित्रपटातून दिले गेलेले सुक्ष्म इशारे आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे पिंक आपल्या समाजात असलेले स्त्रीचे स्थान यावर योग्य भाष्य करतो. यामुळेच हा चित्रपट नक्कीच पाहावा.  

RELATED VIDEOS

RELATED PHOTOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :