Padmaavat Quick Movie Review: ‘बाहुबली’ची भव्यता गाठणारा ‘पद्मावत’

Padmaavat Quick Movie Review: ‘बाहुबली’ची भव्यता गाठणारा ‘पद्मावत’ विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - दीपिका पादुकोण,रणवीर सिंग, शाहिद कपूर, अदितीराव हैदरी
  • निर्माता - संजय लीला भन्साळी फिल्म्स दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी
  • Duration - 2 तास 44 मि. Genre - ऐतिहासिक
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Padmaavat Quick Movie Review: ‘बाहुबली’ची भव्यता गाठणारा ‘पद्मावत’

जान्हवी सामंत


वादात अडकलेला आणि प्रदर्शित होण्याआधीच चर्चेचा विषय ठरलेला ‘पद्मावत’ सिनेमा पाहिल्यानंतर हा एक केवळ मनोरंजन करणारा सिनेमा असून, यात असे विरोध करून आकांडतांडव करण्यासारखे काहीच दिसून येत नाही. राजकारण करण्यासारखे तर काहीच दिसत नाही. एक ऐतिहासिक कथा भन्साळी यांनी त्यांच्या ‘लार्जर दॅन लाईफ’ पद्धतीने मांडली आहे़

संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या नजरेतून मांडलेली एक ऐतिहासिक कथा आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या भावना दुखावल्या जातील आणि  कुठल्याही ऐतिहासिक गोष्टींची छेडछाड होईल अशी सिनेमात एकही गोष्ट नाही. फक्त खुपण्यासारखी गोष्ट म्हणजे यातील ‘जोहर’ अर्थात सतीपद्धतीचे केले गेलेले ग्लोरिफिकेशन.

ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याला राजपूत संस्कृतीची झलक तसंच रणांगणावर रंगणारे युद्ध आणि षड्यंत्र या सगळ्यांचा संगम म्हणजे पद्मावत. भन्साळींच्या सिनेमाला साजेसा भव्यदिव्यपणा. सारं काही डोळे दिपवणारे. मात्र कथेतील आणि व्यक्तीरेखांमध्ये भावनांचा अभाव यामुळे हा सिनेमा कुठेतरी झाकोळला जातो, असे वाटते़ ‘रामलीला’ सिनेमातील क्रूरता आणि ‘बाजीराव मस्तानी’मधील भव्यदिव्यता यांचं मिश्रण ‘पद्मावत’ पाहताना जाणवते़ ‘पद्मावत’ हा सिनेमा मध्यकालीन कवी मलिक मोहम्मद जायसी यांच्या महाकाव्यावर आधारित आहे. अलाउद्दीन खिलजी (रणवीर सिंग) याचे चित्तौडची राणी पद्मावतीबद्दल (दीपिका पादुकोन) निर्माण झालेले आकर्षण आणि तिला मिळवण्याचा अट्टाहास यातून मेवाडचा राजा राणा रावल सिंग (शाहीद कपूर) याच्या साम्राज्यावर सत्ता मिळवण्याची धडपड याच्या अवतीभवती 'पद्मावत' सिनेमाचं कथानक फिरते.

आलाउद्दिन खिलजी हा एक क्रूर योद्धा होता. त्याने हिंद साम्राज्य मिळवण्यासाठी आपल्या स्वत:च्या काकांचा खून केला होता आणि त्याला त्याचा काही खेदही नव्हता़ इतकेच नव्हे तर तो युद्धात जिंकलेल्या स्त्रियांवर अत्याचार करत असे. 

महाराज रावल सिंग (शाहिद कपुर) एक न्यायनिष्ठ आणि कर्तव्यशील राजा होता. या उलट आलाउद्दिन खिलजी होता. खिलजी युद्ध जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जात असे. त्याच्यासाठी युद्ध जिंकणे हेच उद्दिष्ट असायचे. तो कधीच न्याय - अन्याय अशा गोष्टींचा विचार करत नसे.

पहिल्या राणीसाठी अमूल्य हिरा मिळवण्याकरिता जेव्हा सिंघल राज्यात जातो. तिथे तो राणी पद्मावतीला पाहतो आणि पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडतो. तिच्याशी लग्न करून तिला मेवाड राज्यात घेऊन येतो. राणी पद्मावती तिच्या सौंदर्यातून आणि आपल्या आचरणातून सगळ्यांची मने जिंकते़ 

पद्मावतीच्या सौंदर्याची महिमा खिलजीला मेवाड राज्याशी फितुरी केलेल्या एका सल्लागारकडून ऐकायला मिळते. पद्मावतीचे सौंदर्य पाहण्याच्या इच्छेने खिलजी राजा रावल सिंगला पाहुणचारासाठी  दिल्लीत येण्याचे आमंत्रण देतो. राजाला आमंत्रण द्यायचे आणि त्याला कैद करून मेवाड राज्य बळकवण्याचा खिलजीचा मनसुबा असतो पण राजा रावल सिंग त्याचे आमंत्रण नाकारतो.

खिलजीला काही केल्या राणी ‘पद्मावती’ला पहायचे असते. त्यासाठी युद्ध सुरू होण्याआधीच तो स्वत: राजा रावल सिंगच्या महालात भोजनासाठी येतो आणि खिलजी राणा रावल सिंग यास राजा पुढे 'पद्मावती'ला पाहण्याची इच्छा व्यक्त करतो. यावर राजा संतापून खिलजीला महालातून जाण्यासाठी सांगतो पण युद्ध टाळण्यासाठी पद्मावती खिलजी समोर येण्यासाठी तयार होते. ती त्याला आपले रूप आरशातून दाखवते. पण खिलजी त्याने तृप्त होत नाही म्हणून तो राजा रावल सिंगला बंदी बनवतो आणि दिल्लीला नेतो. अशी अट ठेवतो की जर पद्मावती दिल्लीला आली तरच राजा रावल सिंगची सुटका होईल. मेवाडच्या राजाला परत आणण्यासाठी पद्मावती कशी दिल्लीला पोहचते आणि राजा रावल सिंग यांची आणि स्वत:चीही कशी सुटका करून घेते व त्यानंतर खिलजीशी युद्ध करण्याची तयारी करते, हाच या सिनेमाच्या कथेचा मुख्य भाग आहे.

सिनेमाचा पहिला भाग अतिशय लांबवलेला आहे. जवळ जवळ तो १तास ४० मिनीटांचा आहे. जेव्हा खिलजी मेवाडमध्ये येतो त्यानंतर चित्रपट कंटाळवाणा वाटू लागतो. राजपुतांच्या चालीरिती उगाच वाढवल्यासारख्या वाटतात आणि अनावश्यक सवांद नकोसे करतात. खिलजीचे पात्र रंगवताना वासनांध आणि महिलांसाठी असलेली त्याची हाव रणवीरने आपले अभिनय कौशल्य पणाला लावलेले आहे़ त्यासाठी त्याचे कौतुक करायला हवे़ शाहिद कपूरची मुख्य भूमिका असूनही त्याचा अभिनय उठून येत नाही़ त्याचे सरळमार्गी पात्र रणवीरच्या आक्रमक अभिनयापुढे सौम्य वाटते. दीपिकाने रंगवलेले ‘पद्मावती’चे पात्र त्या तोडीचे झाल्याचे दिसत नाही़ राणी पद्मावतीच्या पात्राची हवी तशी खोली दीपिकाला गाठता आली नसल्याचे सातत्याने जाणवते. राजपूतांच्या चालीरीतींचे दृश्य हेच या सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. पण भन्साळीच्या नजरेतून त्यांनी साकारलेला ‘पद्मावत’ सिनेमा नक्कीच मनाला भिडतो.

सिनेमातील आणखी एका व्यक्तीरेखेबद्दल बोलायचे झाले तर ‘गफूर’ हे पात्र. जिम सर्भ याने साकारलेली भूमिका समलैंगिक पात्राची असल्याची जाणवते़ त्याचे आणि खिलजीचे संबंध कुठेतरी अशी समलैंगिकतेची किनार असल्याची जाणीव करून देतात़ शिवाय गुरू राघव चेतन हे पात्र या सिनेमात छाप सोडून जाते़ 

सिनेमाला पूर्णपणे भन्साळी टच आहे. भव्यदिव्य सेट, रंगाने भरपूर साजरी केलेली होळी, रणवीर सिंगचे नृत्य आणि ‘घुमर’ हे सर्व ‘पिंगा’, ‘डोला रे डोला’ या गाण्याची आठवण करून देतात. या सिनेमाचा क्लायमॅक्स देखील ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘देवदास’सारखा लांबवला गेला आहे. नवल म्हणजे, जरी रावल सिंग आणि राणी पद्मावती हे सिनेमाचे मुख्य पात्र असले तरी खिलजीचे पात्र जास्तच वरचढ दिसून येते. ‘बाहुबली’सारखी भव्यदिव्यता पाहायची असेल तर ‘पद्मावत’ जरूर पाहा.

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :