लालबागमधील रॉक आॅन विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - रितेश देशमुख, धर्मेश येलांडे, नर्गिस फाखरी
  • निर्माता - कृशिका लुल्ला दिग्दर्शक - रवी जाधव
  • Duration - 2 तास 20 मिनिट Genre - रोमाँटिक
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

लालबागमधील रॉक आॅन

तो एकाचवेळी तुमच्या हृदयाचे ठोके वाढवणारा आणि तुम्हाला चकित करून तुमच्या डोळ्यात पाणी आणणारा असा आहे.  
चित्रपटाची कथा अगदी डळमळीत आणि अनेक त्रुटी असणारी आहे. ख्रिस (नर्गिस फाखरी) ही अमेरिकन संगीतकार असते. एका मित्राकडून ती एका बँजो बँडचे संगीत ऐकते. आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेसाठी काहीतरी वेगळे संगीत तयार करण्याच्या हेतूने ती मुंबईत जाऊन हा बँड शोधण्याचे ठरवते. तराट (रितेश देशमुख) हा बँजो वाजवणारा आणि खंडणीबहाद्दर गुंड असतो. त्याच्यासोबत त्याचे सहकारी ग्रीस (धर्मेश येलांडे) , वाज्या आणि पेपर हे असतात. तराटच्या घराशेजारील आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांमध्ये हे राहत असतात. साई लीला बँडमधील कलाकार हे गरिबी आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे गांजलेले असतात. ऐशोआरामात आयुष्य काढण्याचे त्यांचे स्वप्न असते. ख्रिस मुंबईत आल्यावर तराटला अनेकवेळा भेटते पण हा तराट तोच बँजो आर्टिस्ट आहे याची तिला कल्पनाच नसते. बऱ्याच वेळानंतर तिला तराट तोच आर्टिस्ट असल्याचे कळते आणि त्याच्या बँडने तिच्यासोबत काम करावे अशी त्याला गळ घालते. ख्रिस आणि त्याचा मित्र मायकी (ल्यूक केनी) हे तराटचे संगीत रेकॉर्ड करतात. साऊथ मुंबईतील नाईट क्लबचा मालक नायर (मोहन कपूर) या बँडसाठी सुरुवातीला नकार देतो आणि त्यांना हिडकावून लावतो. पण तरीही ख्रिस नायरची परवानगी घेऊन नाईट क्लबमध्ये त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करते. हळूहळू हा बँड हिट होतो, नावाजला जातो. त्यांना अनेक ठिकाणाहून शोजच्या ऑफर्स यायला लागतात. यातून त्यांना पैसा आणि प्रसिद्धीही मिळू लागते. सर्व काही सुरळीत चालले असतानाच तराट खंडणीच्या जाळ्यात परत अडकला जातो आणि बँडमधील कलाकार जेलमध्ये जातात. त्यांची वाताहत होते. पण काहीच वेळात सगळे काही सुरळीत होते. त्यांच्या आयुष्यात आलेली ही समस्या केवळ एका हळव्या गाण्यानंतर पूर्वरत होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हा बँड पुन्हा आपल्या पायावर उभा राहतो आणि उच्चवर्गीय दक्षिण मुंबई लोकांच्या नाकावर टिच्चून सोबो म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अंतिम फेरीत कडक परफॉर्मन्स देतो.
या चित्रपटात सर्वांचा अभिनय उत्तम झाला आहे. मिलिंद शिंदे, उदय सबनीस यांसारख्या अनेक चांगल्या मराठी कलाकारांना एका हिंदी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना पाहाणे खरेच चांगले वाटते. बँजो म्हणजे सबकुछ रितेश देशमुख आहे. दारुडा, हळवा परंतु रोमँटिक स्वभावाची भूमिका त्याने योग्यरित्या निभावली आहे. धर्मेश येलांडेनेही ग्रीसचे पात्र सुंदरपणे साकारले आहे. 
विशाल शेखरचे संगीत हे चित्रपटाचा दुसरा हिरो आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. नर्गिस फाखरीची अभिनयक्षमता मर्यादित आहे हे चित्रपट पाहिल्यावर सिद्ध होते. एकूणच बँजो हा मनोरंजक सिनेमा आहे. एबीसीडीप्रमाणे बँजो शहरातील उपेक्षित लोकांचे प्रश्न आणि स्वप्ने मांडणारा आहे. 
रात्रीच्यावेळी धुळीत भांडी घासणारा लहान चहावाला मुलगा, म्हाताऱ्या बँड आर्टिस्टचा अबोला आणि फिरंग माईकचे अस्खलित मराठी यांसारख्या छोट्या गोष्टींतून रवी जाधव यांचे दिग्दर्शन वैशिष्ट्य दिसून येते. या गोष्टी त्यांच्या चित्रपटाची ताकद दाखवून देतात. चित्रपटातील या डझनभर पात्रांमधून या पटकथेची बारकाई अधिक जाणवते.
इतर हिंदी चित्रपटात दिसणाऱ्या श्रीमंत मुंबईपेक्षा या मुंबईचे चित्र खूप वेगळे आहे. रवी जाधव यांनी मुंबईच्या या अनोख्या जगाचे चित्र अत्यंत सुंदररित्या रेखाटन केले आहे. मुंबईमधील झोपड्या, तेथील कामगार वर्ग, त्यांचे राहाणीमान या सगळ्याच गोष्टींमधून खरी मुंबई खूपच वेगळ्यारितीने रवी जाधव यांनी लोकांच्या समोर उभी केली आहे. 

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :