कहानी २ - दुर्गा रानी सिंग : एक थरारक अनुभव

कहानी २ - दुर्गा रानी सिंग : एक थरारक अनुभव विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - विद्या बालन, अर्जुन रामपाल
  • निर्माता - बाऊंडस्क्रिप्ट मोशन पिक्चर्स दिग्दर्शक - सुजॉय घोष
  • Duration - 2 तास Genre - सस्पेन्स
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

कहानी २ - दुर्गा रानी सिंग : एक थरारक अनुभव


जान्हवी सामंत

अभिनेत्री विद्या बालन हिचा ‘कहानी’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांना त्याच्या रहस्यमय कथेमुळे आठवतो. त्यामुळे 'कहानी 2- दुर्गा रानी सिंग'बद्दल रसिकांमध्ये उत्सुकता असणे साहाजिकच आहे. कहानी एवढा रहस्यमय किंवा प्रेक्षकांना दोन तास खिळवून ठेवणारा नसला तरीही 'कहानी 2' हा एक चांगला चित्रपट आहे. ‘कहानी २’ हा चित्रपट एका आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. कोलकाता शहराच्याजवळ चंदननगर या परिसरातमध्ये विद्या सिन्हा (विद्या बालन) आणि तिची मुलगी मिनी (टुनिषा शर्मा) राहत असतात. विद्याच्या अंगावर असलेल्या चुरघळलेल्या साड्या, घरातला पसारा, ऑफीसला जाण्यासाठी ट्रेन पकडायची धावपळ, शहारतली गजबज या वातावरणातून दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी एका सिंगल मदरची जबाबदारी आणि बांधिलकी ही सहजपणे रेखाटली आहे. पण या सगळ्या गदारोळात अचानक एकेदिवशी अपंग मिनी गायब होते आणि इथूनच 'कहानी 2' ची खरी सुरुवात होते. पोलीस इन्स्पेक्टर इंद्रजित सिंग (अर्जुन रामपाल)  या केसची पडताळणी करण्यासाठी कामाला लागतो आणि यानंतर चित्रपटाची कथा हळूहळू उलगडत जाते.      

 इन्स्पेक्टर इंद्रजित (अर्जुन रामपाल) याने केलेल्या प्राथमिक तपासातून विद्याच्या भूतकाळ व वर्तमानाबद्दलची धक्कादायक तथ्ये समोर येतात. ज्यामधून तिच्या मुलीच्या अपहरणाबद्दल खूप महत्त्वाचे धागेदोरे सापडतात. यापेक्षा अधिक गोष्टींचा उलगडा केल्यास त्यातील सस्पेन्स निघून जाईल. चित्रपटाचे कथानक अंदाज बांधण्याजोगे असले तरीही चित्रपटाची कथा मनोरंजक  आहे. याचे श्रेय चित्रपटाच्या दिग्दर्शकाला दिलेच पाहिजे. विद्या सिन्हा या चिंताग्रस्त आईच्या भूमिकेत विद्या बालन अगदी खरी उतरली आहे. विसकटलेले केस, सतत दगदग, अस्थाव्यस्थ अवस्थेत विद्या आकर्षक दिसत नसली तरीही मनाला भावते. लहान मिनीच्या भूमिकेला नाईशा खन्नाने न्याय दिला आहे.  23 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये जुगलने पहिल्यांदाच अर्थपूर्ण भूमिका केली आहे. 
कोलकत्ता या शहराला 'कहानी'मध्ये जितक्या आत्मियतेने दाखवले आहे तितक्याच ते या भागातही दाखवले आहे. कोलकत्तामधील जीवनमान आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी ही फार सुंदरपणे दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री विद्या सिन्हा आणि रजनीगंधा या चित्रपटाला ही घोषने सलाम दिला आहे. कथा इतकी भावूक आणि गतीशीलपणे सादर करण्यात आली आहे की त्यात फारस तथ्य नाही हे बघताना आपल्याला जाणवत नाही. 'कहानी'मध्ये ही असे बरेच प्रश्न अनुउत्तरित राहीले होते. चित्रपट संपल्यानंतर कथेबद्दल मात्र बरेच प्रश्न डोक्यात उभे राहतात. अपहरणकर्ता इतके वर्ष का थांबतो ? मुलीला दुखापत करुन त्याचा काय फायदा होऊ शकतो ? पोलीस यंत्रणा एवढी अजाण कशी असू शकते ? असे बरेच प्रश्न पडतात. कहानी इतका प्रभावी नसला तरीही निश्चितच मनोरंजक आहे 'कहानी 2'. 

RELATED VIDEOS

RELATED PHOTOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :