Chef Movie Review:चव बिघडलेली रेसिपी

Chef Movie Review:चव बिघडलेली रेसिपी विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - सैफ अली खान, पद्मप्रिया, स्वर कांबळे , मिलिंद सोमण
  • निर्माता - भूषण कुमार, राजा कृष्णा मेनन, विक्रम मल्होत्रा दिग्दर्शक - राज कृष्णा मेनन
  • Duration - 2.12 मिनिट Genre - ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Chef Movie Review:चव बिघडलेली रेसिपी

 
  जान्हवी सामंत

जॉन फेवरोच्या ‘शेफ’ नावाच्याच हॉलिवूड चित्रपटाचा हा रिमेक़ ही कथा आहे थ्री स्टार हॉटेलात काम करणाºया रोशन कालरा (सैफ अली खान)याची. रोशनला लहानपणापासून कुकींगमध्ये रूची असते. पण त्याच्या पित्याला याला विरोध असतो. अखेर शेफ बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोशन घरून पळून  जातो. मोठा झाल्यावर रोशन अमेरिकेच्या एका बड्या हॉटेलातील शेफ बनतो. पण एकदा एक ग्राहक त्याने बनवलेल्या पदार्थाची तक्रार करतो आणि यामुळे  संतापून रोशन त्याचे नाक फोडतो. यामुळे त्याला नोकरी गमावावी लागते. रोशन घटस्फोटित असतो. त्याचा व पत्नी राधा मेनन (पद्मप्रिया)चा अरमान(स्वर कांबळे) हा दहा वर्षांचा मुलगा असतो. अरमान आपल्या आईसोबत केरळमध्ये राहत असतो. रोशन रोज स्काईपवरून आपल्या मुलाशी बोलत असतो.  रोशन आपल्यातील खरे कौशल्य गमावत चालला आहे, असे रोशनच्या आजूबाजूच्यांचे मत होऊ लागले असते. याऊलट रोशनची पत्नीला तो त्याच्या मुलापासून दूर जात असल्याचे वाटत असते. नोकरीतील रोशनचे मन उडू लागलेले असते. यातच रागावर नियंत्रण नसल्याने रोशन आपली नोकरीही गमावून बसतो. याच मन:स्थितीत तो भारतात परततो.  कोचीत मुलगा व पत्नी राधा शांततेत तेवढेच कठीण आयुष्य जगत असल्याचे रोशनला दिसते. केरळमध्ये मुलासोबत वेळ घालवल्यानंतर आयुष्यात आपण काय गमावले, हे रोशनला कळून चुकते. अर्थात तरिही काही काळ राहून रोशनला अमेरिकेत परतायचे असते. पण राधा आणि आणि राधाचा प्रियकर (मिलिंद सोमन) या दोघांच्या सल्लयानुसार रोशन केरळमध्ये फुड ट्रक सुरु करतो. एक भंगारात पडलेल्या डबल डेकर बसला नवे लूक देऊन रोशन आपला फूड ट्रक सुरु करतो आणि ‘रोट्जा’ ही एक नवी फ्युजन डिश लॉन्च करतो. या सगळ्यात रोशनला अनेक गोष्टींची नव्याने जाणीव होते. कुकींग हेच त्याचे पॅशन आहे, हे त्याला नव्याने कळते. वडिल आणि मुलाच्या नात्याचे अनेक संदर्भ त्याला नव्याने जाणवतात.
अर्थात  हे ‘संदर्भ’ प्रेक्षकांपर्यंत नेमक्या रूपात पोहोचत नाहीत. यातील खरी अडचण ठरते ती या चित्रपटाची पटकथा. सहज, सुंदर कथा असली तरी हा चित्रपट अतिशय ‘बेसिक प्लॉट’सह सुरु होतो. रोशनच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये काय चुकीचे घडलेयं? कुठल्या कारणाने त्याच्या आयुष्यातला सूर हलवला आहे? हेच कळत नाही. करिअरमधील एकसूरीपणा त्याला छळतोय की त्याचे नैराश्य त्याला छळतेय? हेही समजत नाही. घटस्फोटानंतरही रोशन आपल्या पत्नीसोबत अगदी आनंदात राहतो. तिच्या प्रियकरासोबत जुळवून घेतो, असे असताना नेमका रोशनचा घटस्फोट का झाला? याचेही चित्रपटात अखेरपर्यंत उत्तर मिळत नाही. त्यामुळे रोशनला नेमके काय हवे आहे, हा संमभ्र चित्रपट संपेपर्यंत कायम राहतो आणि कदाचित याच संभ्रमामुळे कथेतील सूर हरपत जातो. पहिल्या भागात चित्रपट अगदीच संथपणे पुढे सरकतो आणि मध्यांतरानंतर  अचानक रोशनचे सगळ्या समस्या चुटकीसरशी सुटू लागतात. त्याचा फूड ट्रक एका रात्रीत प्रसिद्ध होतो. म्हणजेच आधी संथ आणि मग अचानक सारवासारव करावी तसली घाई यामुळे कथेची चव बिघडते.  राजा कृष्ण मेनन यांच्या या चित्रपटातील अनेक दृश्ये यामुळे असंगत वाटायला लागतात. काही ठिकाणी दिग्दर्शक  अगदी बारीक बारीक तपशीलावर लक्ष देतांना दिसतो. विशेषत: उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय संस्कृतीमधील अनेक बारकावे तो अगदी काळजीपूर्वक टीपतो. पण हे बारकावे टीपताना मोठ्या गोष्टी मात्र त्याच्या हातून निसटताना दिसतात. रोशनचा अंतर्गत संघर्ष आणि स्वत:चा पुन्हा लागलेला शोध ही कथा  भ्रम निर्माण करते. आयुष्य हे नानाविध अनुभवांनी भरलेले आहे आणि आयुष्याचा आनंद घेण्यासाठी, त्यातील बरे वाईट अनुभव टीपण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे, असा संदेश हा चित्रपट देतो. एक शेफ आणि लोकांना मनापासून खाऊ घालण्याचे त्याची इच्छा यातील फरक या चित्रपटात मनोरंजकपणे दाखवला आहे. पण कथेची बेसिक रेसपीचं चुकल्याने  चित्रपट बेचव झाला आहे.

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :