Bhavesh Joshi Superhero Movie Review: ना अ‍ॅक्शन, ना एक्ससाईटमेंट!!

Bhavesh Joshi Superhero Movie Review: ना अ‍ॅक्शन, ना एक्ससाईटमेंट!! विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - हर्षवर्धन कपूर, प्रियांशू पैन्यूली, निशिकांत कामत
  • निर्माता - इरॉस इंटरटेनमेंट, रिलायन्स इंटरटेनमेंट, विकास बहल, अनुराग कश्यप दिग्दर्शक - विक्रमादित्य मोटवाने
  • Duration - २ तास ३६ मिनिट Genre - अ‍ॅक्शन ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Bhavesh Joshi Superhero Movie Review: ना अ‍ॅक्शन, ना एक्ससाईटमेंट!!

- जान्हवी सामंत

सुपरहिरोचे चित्रपट सगळ्यांनाच आवडतात. पण यासाठी गरजेची आहे एक उत्कंठावर्धन कथा आणि या कथेला साजेशी तेवढीच जबरदस्त अ‍ॅक्शन. ‘भावेश जोशी’ ही ‘मास्क्ड सुपरहिरो’ची ही कथा समाजातील जळजळीत वास्तव आणि सामान्यांच्या न्यायाची कथा आहे. वरवर ऐकायला हे चांगले वाटत असले तरी या चित्रपटात ‘अ‍ॅक्शन’ आणि ‘एक्साईटमेंट’च्या बाबतीत फार काही नाही, हे आधीच सांगायला हवे.

भावेश जोशी (प्रियांशू पैन्यूली) आणि सिकंदर खन्ना (हर्षवर्धन कपूर) चांगले मित्र आणि रूममेट्स असतात. काही वर्षांपूर्वी झालेल्या जनलोकपाल बिल आंदोलनात भावेश आणि सिकंदर उर्फ सिक्कू या दोघांनीही हिरहिरीने भाग घेतलेला असतो. या दोघांनाही आपल्या देशातून भ्रष्टाचार निखंदून टाकायचा असतो. जनलोकपाल आंदोलन स्थगित झाल्यावर ‘इन्साफ टीव्ही’ या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून भावेश आणि सिक्कू हे दोघेही भ्रष्टाचारविरोधातील आपली लढाई सुरु ठेवतात. या युट्यूब चॅनेलवर लोक आपल्या स्थानिक पातळीवरच्या नागरी तक्रारी दाखल करू शकतात. यानंतर भावेश आणि सिक्कू हे दोघेही जावून त्या समस्या दूर करतात. पण काही वर्षांनंतर या मार्गात यश कमी आणि निराशाच जास्त असल्याचे सिकंदरला जाणवते. देश आणि देशातील लोक बदलायला वेळ लागेल, हेही त्याला कळते. मग सिकंदर आपल्या नोकरीवर लक्ष केंद्रीत करायचे ठरवतो. पण ध्येयवेडा भावेश मात्र आपले ध्येय सोडायला तयार नसतो. एकदा एका मध्यवर्गीय नागरिकाची पाणीटंचाईची समस्या सोडवायला निघालेला भावेश पाणी माफियाच्या जाळ्यात अडकतो. खूप धमकावल्यानंतरही भावेश आपल्या मार्गावरून ढळत नाही आणि यातचं भावेशला आपला जीव गमवावा लागतो. भावेशच्या मृत्यूनंतर सिंकदर आपल्या मित्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बाहेर पडतो.
भावेश जोशी या सुपरहिरोच्या नावाखाली सिकंदर पाणी माफियाचा पर्दाफाश करण्याचे प्रयत्न करतो. या प्रयत्नात तो किती यशस्वी होतो, ते तुम्हाला चित्रपटगृहात जावूनचं बघायला लागेल. 
खरे तर सुपरहिरो चित्रपट हे ‘स्पाईडरमॅन’सारखे ‘अ‍ॅक्शनपॅक्ड’ असावेत किंवा ‘अंकुश’, ‘शूल’, ‘तेजाब’ सारखे ‘रिअ‍ॅलिस्टिक’ म्हणजेच यथार्थवादी असावेत. पण ‘भावेश जोशी’ हा चित्रपट ‘धोबी का कुत्ता़...’ यासारखा ना इकडचा वाटतं, ना तिकडचा भासतं. यातील सुपरहिरो बदला घ्यायला निघतो खरा पण पहिल्याचं टप्प्यांत मार खातो. चित्रपटाची कथा अगदीच संथगतीने पुढे सरकते. त्यातचं चित्रपटाचा पहिला भाग कथेची पार्श्वभूमी तयार करण्यातचं जाते. सिकंदरचा राग आणि आवेश दुस-या भागात बघायला मिळतो. सरतेशेवटी चित्रपटाची कथा अगदीचं मनाला न पटणारी वाटते. त्यामुळे सुपरहिरो आणि त्याचा मित्र यांच्याशी शेवटपर्यंत जुळता येत नाही, त्यांच्याबद्दल जराही सहानुभूती वाटत नाही. अभिनयाच्या बाबतही दोन्ही हिरो पुरती निराशा करतात. थोडक्यात हा सुपरहिरो चित्रपट टाळला तरी चालेल.
 

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :