Babumoshai Bandookbaaz Movie Review : नवाजचे चाहते असाल तरच बघा!

Babumoshai Bandookbaaz Movie Review : नवाजचे चाहते असाल तरच बघा! विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - नवाजुद्दीन सिद्दीकी,दिव्या दत्ता,अनिल जॉर्ज,बिदीता बाग
  • निर्माता - किरण श्राॅफ दिग्दर्शक - कुशान नंदी
  • Duration - 2 तास Genre - ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Babumoshai Bandookbaaz Movie Review : नवाजचे चाहते असाल तरच बघा!

-जान्हवी सामंत

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटाद्वारे आपल्या गँगस्टर अवतारात परतला आहे. आधीपासून विविध कारणाने चर्चेत राहिलेला ‘बाबूमोशाय बंदूकबाज’हा चित्रपट आज शुक्रवारी रिलीज झाला.  

‘बाबूमोशाय बंदूकबाज’ ची कथा खरे तर एक धार असलेली कथा आहे. पण दुर्दैवाने ही कथा गुंफतांना प्रचंड गफलत झालीय. कॉन्ट्रक्ट किलरच्या आयुष्यावर बेतलेले अनेक चित्रपट आपण  याआधीही बघितले आहेत.  हा चित्रपटही असाच. बाबू (नवाजुद्दीन) हा एक कॉन्ट्रक्ट किलर असतो. सुपारी घेऊन पैशासाठी लोकांना निर्दयपणे ठार मारणे, हे त्याचे काम. चिकन लेग्ज चघळणारा, देहविक्रय करणाºया महिलांकडे जाणारा, आपल्या देशी स्टाईलमध्ये कंबरेखालच्या शिव्या देणारा नवाज यात दिसतो. पण तरिही प्रेक्षकांची सहानुभूती घेऊन जातो. कदाचित चित्रपटातील बहुतांश पात्र विचित्र लैंगिक प्रवृत्तींनी भरलेले असल्याने असे असावे. 

कथेची सुरुवात होते ती, दुबे (अनिल जॉर्ज)या विकृत राजकारण्याच्या एन्ट्रीने. स्वत:च्या पत्नीला दुस-यासोबत पाहून दुबेला समाधान मिळत असते. बाबू म्हणून नवाजची एन्ट्री त्यातुलनेत बरीच शांतपणे होते. कुणालाही चुटकीसरशी मारणे आणि मारल्यानंतर बाबू हे काम केवळ पैशासाठी करतो, असे सांगून तितक्याच सहजपणे निघून जाणे, असा बाबू प्रचंड मनमौजी असतो. तो जीजी(दिव्या दत्ता)साठी काम करत असतो. जीजी बाबूला एक सुपारी देते आणि याचदरम्यान बाबूची ओळख फुलवाशी (बिदीता बाग) होते. फुलवाकडे बाबू आकर्षित होतो आणि   फुलवाचे मन जिंकण्यासाठी तिच्या दोन बलात्काºयांना ठार मारतो. यामुळे जीजी संतापते. याचदरम्यान बांके(जतिन गोस्वामी) याच्याशी नवाजची ओळख होतो. बांके हा बाबूचा फॅन असतो. त्यालाही बाबूसारखे कॉन्ट्रक्ट किलर व्हायचे असते. तो बाबूला गुरु मानतो. पण सोबत दोघांमध्ये स्पर्धाही सुरु होते. जो अधिक लोकांना मारेल तो नंबर वन किलर ठरेल, असे बाबू व बांके ठरवतात. पण याच स्पर्धेदरम्यान त्यांच्यासोबत आणखी एक खेळ खेळला जात असतो, याबाबत दोघेही अज्ञानी असतात. दुबे आणि जीजी यांच्या वर्चस्वाच्या लढाईत बाबू मोहरा बनतो. बांके बाबूला धोका देतो आणि गोळी मारतो. अर्थात यानंतर आठ वर्षांनंतर बाबू परत येतो आणि सगळ्यांचा बदला घेतो. अर्थात या बदल्याच्या लढाईतही एक टिष्ट्वस्ट येतो. पण यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल.

चित्रपटाची सुरुवात चांगली होती. पण खरे सांगायचे तर अख्ख्या चित्रपटापेक्षा ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ तुकड्या- तुकड्यात मनाला भावतो. मध्यांतरापर्यंत चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतो. मग त्याचा बटबटीतपणा खटकायला लागतो आणि नंतर पुन्हा क्लायमॅक्सला उत्कंठा वाढवतो. नवाज हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. त्याचा अभिनय, त्याचा पडद्यावरचा वावर तुम्हाला कुठेही निराश करत नाही. पण दुबे, बांके, फुलवा हे पात्र मात्र पुरती निराशा करतात. त्यामुळे बाबूशिवाय इतर चित्रपटांवर दिग्दर्शक फोकस करतो तेव्हा चित्रपट आपली चमक घालवून बसतो. चित्रपटाची गावखेड्याची एकदम देशी पार्श्वभूमी, अतिशय बोल्ड सेक्स सीन्स, आणि अश्लिल शिव्या व संवादांची भरमार यामुळे बहुतांश लोकांना हा चित्रपट खटकू शकतो. कदाचित कुटुंबासोबत हा चित्रपट पाहणे तुमच्यासाठी असहज ठरू शकते. चित्रपटातील काही  लैंगिक अत्याचाराचे सीन्स अनावश्यकरित्या विकृत दाखवण्यात आले आहेत. एकंदर काय तर तुम्ही नवाजचे चाहते आहात की नाही, यावर तुम्ही हा चित्रपट पाहावा की नाही, हे अवलंबून आहे. शिवाय तुम्ही नवाजचे चाहते आहात की नाही, यावरच हा चित्रपट तुम्हाला आवडणार की नाही, हेही ठरणार आहे. तुम्ही नवाजचे चाहते नसाल तर हा चित्रपट पाहणे अर्थहीन आहे, असेच म्हणावे लागेल.

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :