बार बार देखो विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - कॅटरिना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा, राम कपूर, सारीका
  • निर्माता - धर्मा प्रोडक्शन दिग्दर्शक - नित्या मेहरा
  • Duration - 2 तास Genre - रोमांटीक
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

बार बार देखो

जान्हवी सामंत

अनेक पुरुष आपल्या ऑफिसमधील कामांमुळे घरातील कामे वेळात पूर्ण करू शकत नाहीत. तसेच अनेक वडिलांना आपली मुले कोणत्या इय्यतेत शिकतात हे विचारल्यावर थोडा वेळ विचार करावा लागतो किंवा मुले शाळेत किती वाजता जातात हेदेखील माहीत नसते. अशा पुरुषांनी आता जागृत व्हायची वेळ आली आहे.बार बार देखो हा नित्या मेहराचा पहिलाच दिग्दर्शकीय चित्रपट डोळ्यांत अंजन घालणारा आहे. पुरुषांनी त्यांच्या आयुष्यातील समस्या सोडवून छोट्या छोट्या गोष्टींची प्रशंसा करणेदेखील गरजेचे आहे हे हा चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल. परंतु या चित्रपटात अतिशय गुंतागुंतीने हा संदेश देण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केला आहे असे हा चित्रपट पाहाताना सतत वाटते. दोन सुंदर लोकांना चित्रपटात घेऊन त्यांना कुरूप, दुःखी बनवण्यासाठी आणि त्यांच्याभोवती एक अतिशय कंटाळवाणी कथा गुंफण्यासाठी दिग्दर्शकाकडे नक्कीच विशेष प्रतिभा असावी लागते. बार बार देखो ही कथा वैदिक गणितात पारंगत असलेल्या जय वर्मा (सिद्धार्थ मल्होत्रा) आणि कलाकार दिया कपूर (कॅटरिना कैफ) यांच्याभोवती फिरते. त्या दोघांचे लहानपणापासूनच एकमेकांवर खूप प्रेम असते आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. जय गणिताचा प्राध्यापक असतो त्याला वैदिक गणित आणि त्याचा अंतराळातील प्रवासावर होणारा परिणाम यावर संशोधन करायचे असते. यासाठी त्याला केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असतो. पण लग्न,रितीरिवाज, कुटुंब, नातेवाईक यांमध्ये त्याचे करियर खूप मागे पडत असल्याचे त्याला जाणवते. आपल्या लग्नापेक्षा आपले करियर हे अधिक महत्त्वाचे आहे असे त्याला सतत वाटायला लागते. लग्नाच्यावेळी पंडिताने मनगटावर बांधलेल्या धाग्यामुळे तो त्याच्या पुढील आयुष्याचा प्रवास करून येतो. या पुढच्या आयुष्यात पत्नीपेक्षा करियरला अधिक महत्त्व दिल्याने त्याचे आयुष्य किती एकटे पडले आहे आणि तो किती दुःखी आहे याची जाणीव त्याला होते. त्यानंतर त्या पंडिताच्या सांगण्यावरून जय त्याची वागणूक बदलतो आणि स्वतःसाठी एक आनंदी शेवट निवडतो. आपल्या आवडत्या लोकांसोबत तो जे मोजूनमापून वागत असतो त्या गोष्टी संपूर्णपणे बदलतो.
 
खरे तर या चित्रपटातून खूपच चांगला विचार मांडलेला आहे. चित्रपटाची सुरुवात ही चांगली होती. चित्रपटाच्या सुरुवातीचे दृश्यही खूपच रंजक वाटतात. पण नंतर कथेत चढउतार यायला लागतात. दियाचे वडिल (राम कपूर), दियाची आई (सारीका), जयचे मित्र राज (ताहा शाह) आणि चित्रा (संयानी गुप्ता) हे जय आणि दियाच्या कुटुंबातील सदस्य सुरुवातीला कथेत एक वेगळा उत्साह आणतात पण नंतर त्याचा कंटाळा यायला लागतो. एकंदरीत संपूर्ण चित्रपटच कंटाळवाणा वाटतो. चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अपयशी ठरतो. जय आणि दिया यांनी एकत्र राहावे असे आपल्याला का वाटले पाहिजे. जर ते दोघे एकमेकांवर इतके प्रेम करतात तर एकमेकांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं या गोष्टींवर चर्चा का करत नाहीत. तसेच एकमेकांच्या महत्त्वाच्या निर्णयांविषयी एकमेकांना कल्पना का देत नाहीत. संपूर्ण चित्रपटात दिया अतिशय चिडलेली, दुखावलेली दिसते तर जयला आपल्या चुकांची जाणीव असल्याने तो सतत दियाची माफीच मागत असतो या गोष्टी प्रेक्षकाला नक्कीच खटकतात. या चित्रपटातील त्या दोघांचे लुक्स, त्यांचे मेकअप हे तितके चांगले नाहीत. वेगवेगळ्या गेटअपमध्ये वावरणारे कॅटरिना आणि सिद्धार्थ आपल्याला बहुतांश वेळा अस्वस्थ असल्यासारखेच वाटतात. आपल्या चित्रपटांमधून नेहमीच करियर हा स्त्री आणि पुरुषांच्या नात्यातील सगळ्यात मोठा खलनायक असतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. बदललेल्या वेळानुसार खरे तर या गोष्टी अतिशय जुन्या झालेल्या आहेत.प्रमुख जोडीमध्ये अजिबातच नसलेली केमिस्ट्री हा बार बार देखो या चित्रपटाचे सगळ्यात मोठे अपयश आहे. जय आणि दियामध्ये कुठेच आपल्याला केमिस्ट्री पाहायला मिळत नाही. ग्राऊंडहॉग डे या हॉलिवुड चित्रपटावर हा चित्रपट बेतलेला वाटतो. तसेच हा चित्रपट पाहाताना प्यार के साईड इफेक्टस, शादी के साईड इफेक्टस यांसारख्या रोमेन्टिक कॉमेडी चित्रपटाची नक्कीच आठवण येते. पण या चित्रपटांत असणारा विनोद आपल्याला बार बार देखो मध्ये पाहायला मिळत नाही. बार बार देखो या चित्रपटातून कोणते ज्ञान मिळत नाही की तो चित्रपट खळखळून हसवत नाही. हा चित्रपट नाही पाहिला तरी चालेल. 

RELATED VIDEOS

RELATED PHOTOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :