अखेर उत्तर मिळाले.... विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी,तेलगु,तमिळ, कलाकार - प्रभास,राणा डुग्गुपती,अनुष्का शेट्टी,तमन्ना भाटीया
  • निर्माता - धर्मा प्रोडक्शन्स दिग्दर्शक - एस.एस.राजामौली
  • Duration - 2 तास Genre - एक्शन ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

अखेर उत्तर मिळाले....

जान्हवी सामंत 

'बाहुबली'प्रमाणे 'बाहुबली 2' ही तितकाच उत्कंठापूर्ण आहे. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच बाहुबली 2 प्रेक्षकांना आपल्या गुंतवून ठेवतो. बाहुबली या पात्रची शक्ती, दयाळूपणा आणि एका पेक्षा एक अॅक्शनसीन्स पाहण्यासारखे आहेत.  बाहुबली सिंहासनावरच्या राज्याभिषेकाच्या काही दिवसांपूर्वी ही गोष्ट सुरू होते. मध्यंतरापर्यंत चित्रपट पूर्णपणे अॅक्शनने भरलेला आणि अत्यंत प्रभावी असा आहे. राज्य अभिषेकाआधी राजमाता शिवगामी बाहूबली ला देशभर हिंडून प्रजेची  त्यांच्या राजाबद्दल असलेल्या अपेक्षा ह्याची जाण करून घ्यायला सांगते. राज्यभिषेका पूर्वी राज्यमाता शिवगामी बाहुबलीला देशभर फिरुन प्रजेची त्यांच्या राजाबद्दल असलेल्या अपेक्षा याची माहिती करुन घ्यायला सांगते.

त्याच्या भटकंतीच्या काळात तो कुंटल देशात येऊन पोहचतो तिकडची शूर राजकुमारी देवसेना बाहुबलीला खूप आवडते, तिला आपलेसे करण्यासाठी बाहुबली एक मतिमंद मुलगा आहे असे नाटक करतो आणि तिच्या राज भवनात राहायला लागतो.

बाहुबलीच्या राज्यअभिषेकावर नाराज असलेला त्याचा मोठा भाऊ भल्ला रोज बाहुबलीकडून सिंहासन कसे बळकवता येईल याच प्रयत्नात असतो. त्याला देवसेनेचं चांगलंच निमित्त मिळते. राजमातेला बाहुबली आणि देवसेना यांच्या नात्याबद्दल काहीच कल्पना नसते याचाच फायदा बल्ला घेतो. आपल्या आईला देवसेनेकडे स्वतः साठी लग्नाची मागणी घालायला सांगतो, तू मला सिंहासन नाही दिलेस त्या बदल्यात माझा विवाह या सुंदरीशी करून दे असे वचन तो आईकडून घेतो.

 राजकुमारीचे मन जिंकून जेव्हा बाहुबली माहिस्मतिच्या राज्यात परत येतो तेव्हा त्याला कळते की राजमातेने बल्लाचा विवाह देवसेनेशी ठरवला आहे. देवसेनेशी विवाह करायचा असेल सिंहासनला मुकावे लागेल असे राजमाता बाहुबलीला सांगते. देवसेनेला दिलेल्या शब्दामुळे बाहुबली आपले सिंहासन आणि राज्य सोडून देतो आणि देवसेनेशी लग्न करतो, त्याच्या या निर्णयामुळे राजमाता नाराज होते आणि त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो. याच दुराव्याचा फायदा बल्ला घेतो आणि बाहुबलीला वनवासाला पाठवतो.

आपल्या गर्भवती पत्नीसोबत बाहुबली छोट्याश्या गावात राहत असतो तेव्हा बल्ला बाहुबलीला मारण्याचे कट कारस्थान रचतो. भरभरून एक्शन, सीन वेगाने पुढे जाणारी कथा, मनमोहक दृश्य, भव्य सेट, आपल्या पहिल्या भागा सारखाच लक्षात राहण्यासारखा हा चित्रपट आहे, कथेतील बारीकसारिक धागेदोरे, उत्तम सवांद या सर्वामुळे 'बाहुबली २' हा एक मनोरंजक चित्रपट आहे, थिएटरला जाऊन जरूर पाहा नाहीतर कटप्पा ने बाहुबली ला का मारले हे कसे तुम्हाला कळणार?

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :