Anarkali of Arrah REVIEW : एक आनंददायी अनुभव विषयी आणखी काही

  • भाषा - हिंदी कलाकार - स्वरा भास्कर,संजय मिश्रा,पंकज त्रिपाटी,संदिप कुमार
  • निर्माता - प्रिया कूपर आणि संदिप कपूर दिग्दर्शक - अविनाश दास
  • Duration - 2 तास Genre - कॉमेडी म्युझिकल ड्रामा
cnx masti rating
Readers rating
Readers review
(0)

Editors review

Anarkali of Arrah REVIEW : एक आनंददायी अनुभव

-जान्हवी सामंत

 ‘अनारकली आॅफ आरा’ हा चित्रपट आज चित्रपटगृहांत झळकला.  या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवणारे अविनाश दास यांचे कष्ट फळास आले, असेच हा चित्रपट पाहिल्यानंतर म्हणावे लागेल. कारण एका गंभीर मुद्याला वाचा फोडण्यात दास यशस्वी झाले आहेत. या चित्रपटात ना लव्ह स्टोरी आहे,ना कुठले रोमॅन्टिक गाणे. या चित्रपटात आहे तो स्वत:च्या अटींवर जगणा-या एका महिलेच्या आयुष्यातील  संघर्षाची कथा.

अनेकदा कमी बजेटचे चित्रपटही बरेच काही बोलून जातात. स्त्रीला तिने कधी आणि कोणाबरोबर लैंगिक संबंध ठेवावेत, याच्या निवडीचा अधिकार आहे. लैंगिक संबंध  हे स्त्रीच्या संमतीनेच व्हायला हवे, असा एक मोठा संदेश एका मनोरंजक कथेच्या माध्यमातून तितक्याच प्रभावीपणे या चित्रपटाद्वारे समाजाला दिला गेला आहे. हेच या चित्रपटाचे खरे यश आहे. बिहारची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात आरा शहरात  राहणाºया आणि नाच-गाणे करून इतरांचे मनोरंजन करणाºाा एका गायिकेची कथा यात रंगवण्यात आली आहे. अनारकली( स्वरा भास्कर) ही एक बिनधास्त, फॅशनेबल लोककलाकार असते. तिचे सौंदर्य आणि आवाज यामुळे आजूबाजुच्या शहरांमध्येही ती बरीच लोकप्रीय असते. काहीसे अश्लिल या वर्गात मोडणाºया द्विअर्थी लोकगीतांचा भरणा असलेल्या तिच्या रंगीला आॅकेस्ट्रावर बिहारी पुरूष अक्षरश: फिदा असतात. पुरूषांच्या लालची नजरांची अनारकलीला सवय असते. पण त्याचा राग येण्याऐवजी त्याचा तिला अभिमानही असतो. अर्थात ‘मेरे जिस्म की मैं महारानी’ ही अनारकलीची अट असते. एकदा एका सरकारी कार्यक्रमात दारूच्या नशेत तर्र असलेला कुलगुरू (सौरभ मिश्रा) स्टेजवर तिच्याशी लगट करू पाहतो. स्टेजवर इतक्या लोकांसमोर झालेल्या या विनयभंगांने अनारकली पेटून उठते आणि पोलिसांत तक्रार नोंदवायला जाते. पण समाजाच्या नजरेत केवळ एक ‘बाजारू बाई’ अशीच प्रतीमा असलेल्या अनारकलीला पोलिस धुडकावून लावतात. यालऊट तिच्या प्रेमात धूंद झालेला कुलगूरू वारंवार बोलवून तिला विकत घेण्याचा प्रयत्न करत राहतो. या बळजबरीने आत्मसन्मान दुखावलेली अनारकली आणखीच संतापले आणि संतापाच्या भरात कुलगुरूच्या थोबाडीत मारते. याचा बदला म्हणून कुलगुरूची माणसं आणि पोलिस दोघेही अनारकलीच्या हात धुऊन मागे लागतात. वारांगणा ठरवून तिला अटकही केली जाते. या सगळ्यांमुळे निराश होत अनारकली दिल्लीला पळून जाते खरी. पण काही दिवसांनंतर ती पुन्हा परतते आणि परतून कुलगुरूला धडा शिकवते, तो कसा, हेच या चित्रपटात दाखवले आहे.

स्वरा भास्करने अनारकलीची भूमिका इतक्या सुंदरतेने पडद्यावर साकारली आहे की, त्याला तोड नाही. तिचा बिनधास्तपणा, स्वत:च्या कामुकतेचे तिने स्वत:च गायलेले गोडवे, तिचा संताप,पुरूषांच्या लालची नजरा ओळखण्याचे तिचे कसब, त्या नजरेतील स्वत:ची प्रशंसा स्वीकारतानाचा सहजभाव असे सगळे स्वराने प्रचंड अदाकारीने पडद्यावर जिवंत केले आहे. मी सतीसावित्री नाही. पण मला काही मर्यादा आहेत, असे म्हणणारी अनारकली पाहणे त्यामुळेच एक आनंददायी अनुभव आहे.  अनारकलीला मिळवण्यासाठी इरेला पेटलेला सौरभ मिश्रा याचा अभिनयही बघण्यासारखा आहे. त्याचा रंगेलपणा, त्याचे नशेबाजपणा, त्याने केलेले शक्तीप्रदर्शन सगळेच अफलातून आहे. एका गंभीर मुद्यावर भाष्य करणारा चित्रपट असूनही ‘अनारकली आॅफ आरा’ मनोरंजक सिनेमा आहे. कलाकारांच्या जबरदस्त अभिनयाने  या चित्रपटाला ‘चार चाँद’ लावले आहेत.

‘मेरे जिस्म की मैं महारानी’ असे तोºयात सांगणारी अनारकली कुठेही बिभत्स वाटत नाही. उलट आपण प्रत्येक प्रसंगासोबत तिच्यासोबत जुळत जातो, हे या चित्रपटाचे यश आहे. स्त्रीच्या लैंगिक भावनांवर भाष्य करणारा हा चित्रपट ‘पिंक’च्या जवळ जाणारा असला तरी जे यात आहे ते ‘पिंक’मध्ये नाही.

 
 

RELATED VIDEOS

Write A Review

Rate the movie

Readers Review

  • Be the first person to review this movie!

मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :