​झहीर खान अन् सागरिका घाटगेच्या लग्नाला नोव्हेंबरचे मुहूर्त!

झहीर व सागरिका या दोघांचा साखरपुडा कधीचाच झाला. आता हे कपल लग्न कधी करणार, याचीच सगळ्यांना प्रतीक्षा होती. पण आता ही प्रतीक्षा संपलीय.

​झहीर खान अन् सागरिका घाटगेच्या लग्नाला नोव्हेंबरचे मुहूर्त!
Published: 13 Sep 2017 03:34 PM  Updated: 13 Sep 2017 03:34 PM

क्रिकेट आणि बॉलिवूडचे कनेक्शन सर्वांनाच ठाऊक आहे. आता असेच एक कनेक्शन पक्के होणार आहे. अर्थात क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील एक कपल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आता तुमच्या मनात सर्वात आधी विराट कोहली व अनुष्का शर्माचे नाव आले असणार, हे आम्हाला ठाऊक आहे. पण आम्ही विराट व अनुष्काबद्दल नाही तर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्याबद्दल बोलतोय.
झहीर व सागरिका या दोघांचा साखरपुडा कधीचाच झाला. आता हे कपल लग्न कधी करणार, याचीच सगळ्यांना प्रतीक्षा होती. पण आता ही प्रतीक्षा संपलीय.   म्हणजेच झहीर व सागरिकाच्या लग्नाची तारीख आली आहे. होय, झहीर व सागरिकाच्या लग्नाला  नोव्हेंबरचे मुहूर्त मिळाले आहे. झहीर आणि सागरिका नोव्हेंबर महिन्यात विवाहबद्ध होणार आहे. या महिन्यात २७ नोव्हेंबरला त्यांच्या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. काही निवडक लोकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. यानंतर मुंबई आणि पुणे अशा दोन ठिकाणी स्वागत सोहळा होणार आहे. लग्नसोहळ्याचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही. पण तूर्तास या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरु आहे.  

ALSO READ : जाणून घ्या, झहीर खान व सागरिका घाटगेच्या Winter Weddingचा प्लान?

 गत एप्रिल महिन्यात झहीर व सागरिका यांचा साखरपुडा झाला होता. झहीरने सोशल मीडियावर साखरपुड्याची बातमी शेअर केली होती. काही दिवसांपूर्वी सागरिकाने तिच्या लग्नाचा ‘न ठरलेला प्लान’ शेअर केला आहे.  अद्याप लग्नाची कुठलीही तयारी सुरु झालेली नाही, असे तिने म्हटले होते. ‘तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण अद्याप आम्ही कुठलीही शॉपिंग केलेली नाही. अद्याप लग्नाचा हॉलही बुक झालेला नाही. ही सगळी तयारी करताना ताण येतो. कारण जेव्हा केव्हा आम्ही याबद्दल बोलतो, तेव्हा आता फार वेळ उरलेला नाही, असे आमच्या लक्षात येते. आता या इतक्या कमी वेळात सगळे कसे करता येईल, याचा विचार आम्ही चालवला आहे’, असे सागरिका म्हणाली होती. पण आता मुहूर्त ठरला म्हटल्यावर सागरिका व झहीरच्या लग्नाची तयारी सुरु झाली असणार, हे नक्कीच!


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :