​बायोपिकसाठी यो यो हनी सिंगला मिळाली इतक्या कोटींची आॅफर!

आपल्या रॅपने बॉलिवूडपासून युट्यूब हादरवून सोडणारा रॅपर यो यो हनी सिंगची रिअल लाईफ स्टोरी लवकरच आपल्याला पडद्यावर दिसू शकते. होय, यो योच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची तयारी सुरु झाली आहे.

​बायोपिकसाठी यो यो हनी सिंगला मिळाली इतक्या कोटींची आॅफर!
Published: 23 Oct 2017 02:01 PM  Updated: 23 Oct 2017 02:01 PM

आपल्या रॅपने बॉलिवूडपासून युट्यूब हादरवून सोडणारा रॅपर यो यो हनी सिंगची रिअल लाईफ स्टोरी लवकरच आपल्याला पडद्यावर दिसू शकते. होय, यो योच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची तयारी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, या बायोपिकच्या परवानगीसाठी मेकर्सने हनीला तगडी रक्कम देऊ केली आहे. ही रक्कम थोडी थोडकी नाही तर कोटीच्या घरात आहे. होय, या बायोपिकसाठी मेकर्सने हनीला २५ कोटी रूपयांची रक्कम आॅफर केल्याचे कळतेय.



हनी गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधून दूर आहे. पण तरीही तो चर्चेत आहे. या चर्चेचे कारण म्हणजे, हनीचे बॉलिवूडमधून अचानक गायब होणे. त्याचे अचानक गायब होणे, चाहत्यांना बरेच खटकले आहे. हनी सिंह गेल्या गत काळात वादात सापडला होता. गत काळात सुमारे दीड वर्षे योयो बॉलिवूडमधून पुरता गायब झाला होता. यादरम्यान त्याच्याबद्दल नाही नाही त्या अफवांचे पीक आले होते. पण यानंतर एका मुलाखतीत याकाळात त्याच्यासोबत काय काय घडले, हे हनीने जगासोबत शेअर केले होते.  बॉलिवूडमधून काही काळ  मी  गायब होतो. बायपोलर डिसआॅर्डरशी माझी झुंज सुरु होती.  यादरम्यान मी चार डॉक्टर बदलले. औषधांचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नव्हता. मी अक्षरश: वेडा झालो होतो. ते १८ महिने माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण दिवस होते. मी रिहॅब सेंटरमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण मी नोएडातील माझ्या घरी होतो, असे हनीने या मुलाखतीत कबुल केले होते.  बायपोलर डिआॅर्डरमध्ये रूग्णाचे मूड क्षणाक्षणाला बदलते. कधी पराकोटीचा आनंद तर कधी घोर निराशा, असे त्याचे मूड असते. याच आजारामुळे हनीसिंह मद्याच्या आहारी गेला. इतका की, त्याला हे व्यसन सोडवण्यासाठीही उपचार घ्यावे लागले होते. हनीच्या या फेजसह त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा त्याच्या बायोपिकमधून होऊ शकतो. अर्थात त्यासाठी हनीने २५ कोटींची आॅफर स्वीकारायला हवी. हनीने ही आॅफर स्वीकारलीच तर त्याचे बायोपिक पक्के समजा. हनीच्या आयुष्यावर बेतलेले बायोपिक पाहणे तुम्हाला आवडेल ना?  

ALSO READ: जाणून घ्या, ‘या’ सेलिब्रिटींना व्यसनांमुळे झाला मनस्ताप
 


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :