‘व्हीआयपी २’च्या फर्स्ट लुकमध्ये काजोल-धनुषचा ‘फेस आॅफ’!

धनुष आणि काजोलच्या चाहत्यांसाठी हे माझे पहिले गिफ्ट..’ असे कॅप्शन दिले आहे. या चित्रपटाचे विशेष हे आहे की, यात काजोल ही खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘व्हीआयपी २’च्या फर्स्ट लुकमध्ये काजोल-धनुषचा ‘फेस आॅफ’!
Published: 01 Jan 2017 06:02 PM  Updated: 01 Jan 2017 12:33 PM

‘बॉलिवूडची सिम्रन’ काजोल आणि दाक्षिणात्य दिग्दर्शक, अभिनेता धनुष यांच्या चाहत्यांची प्रतिक्षा आता संपलीय. कारण त्यांचा आगामी ‘वेलैया पट्टाथारी २’ चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच आऊट करण्यात आलाय. निर्माती सौंदर्या यांनी टिवटरवर हा फर्स्ट लुक काजोल आणि धनुष यांच्यासोबत शेअर केलाय. या फोटोला ‘नवीन वर्षाची सुरूवात या फर्स्ट लुकसह..धनुष आणि काजोलच्या चाहत्यांसाठी हे माझे पहिले गिफ्ट..’ असे कॅप्शन दिले आहे. या चित्रपटाचे विशेष हे आहे की, यात काजोल ही खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. 

                         

याअगोदर निर्माता दिग्दर्शक राजीव राय यांच्या १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘गुप्त’ या चित्रपटात खुनी खलनायिकेची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा तशाच रूपात काजोल चित्रपटात दिसणार असल्याचे कळतेय. आगामी ‘व्हीआयपी २’ या दाक्षिणात्य चित्रपटात ती खलनायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. या पोस्टरमध्ये धनुष हा इंजिनियरच्या रूपात दिसत असून काजोल एखाद्या मोठ्या उद्योजकाच्या लुकमध्ये दिसत आहेत. तर दुसऱ्या  पोस्टरमध्ये अनेक बेरोजगार कामगारांसोबत धनुष चहा पिताना दिसतो आहे. या पोस्टरवरून असे दिसतेय की, ते दोघे एकमेकांचे खुप मोठे शत्रु असल्यासारखे दिसत आहेत.

                            

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेचा सुपरस्टार धनुष याची मुख्य भूमिका असलेल्या ‘व्हीआयपी २’ या चित्रपटात काजोल सिंगल मदरची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे ही भूमिका ‘ग्रे शेड’ असणारी आहे. ‘वेलैला पट्टधारी’ या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘व्हीआयपी २’चे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.


दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया नच बलियेचे विजेते ठरतील का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :