'बाबुजी धीरे चलना' फेम ज्येष्ठ अभिनेत्री शकिला बानो पडद्याआड

50 च्या दशकात दास्तानसारख्या सिनेमांमधून त्यांनी रूपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यांचे 'आरपार' आणि 'सीआयडी' 'श्रीमान सत्यवादी', 'श्रीमतीजी', 'उस्तादों के उस्ताद', 'रेशमी रुमाल' हे सिनेमे विशेष गाजले. आपल्या कारकीर्दीत त्यांना जवळपास 50 सिनेमात काम केले होते.विशेषत:1954 साली आलेल्या 'आरपार' सिनेमातील त्यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले 'बाबुजी धीरे चलना' हे गाणे आजही सिनेरसिकांच्या ओठांवर रूळते.

'बाबुजी धीरे चलना' फेम ज्येष्ठ अभिनेत्री शकिला बानो पडद्याआड
Published: 21 Sep 2017 02:20 PM  Updated: 21 Sep 2017 02:20 PM

'लेके पहले पहले प्यार' आणि 'बाबूजी धीरे चलना' अशा हिट गाण्यांमुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री शकीला यांचं निधन झालंय. 82 वर्षीय शकीला यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय. शकीला यांचे भाचे नासिर खान यांनी फेसबुक अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. शकीला यांचा जन्म 1 जानेवारी 1935 रोजी झाला होता. बादशाह बेगम असं त्यांचं मूळ नाव होतं. त्यांना त्यांच्या काकूने सांभाळलं होतं. पन्नासच्या दशकात दास्तान या सिनेमातून शकीला यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर आरपार, सीआयडी, श्रीमान सत्यवादी, उस्तादों के उस्ताद, रेश्मी रुमाल या सिनेमातील अभिनेत्री शकीला यांच्या भूमिका गाजल्या. पन्नासहून अधिक सिनेमात शकीला यांनी काम केलं होतं. 1963 साली त्या विवाहबंधनात अडकल्या आणि त्यानंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्या. राजद्रोही या 1993 साली आलेल्या सिनेमातून त्यांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं होतं. अखेर या अभिनेत्रीनं वयाच्या 82व्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय.


RELATED ARTICLES


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :