टायगर श्रॉफच्या ठेक्यावर थिरकली नागपूरची तरूणाई!

खचाखच भरलेले स्टेडियम...टायगर...टायगरच्या आरोळ्या अशा अमाप उत्साहात अभिनेता टायगर श्रॉफ नागपुरच्या तरूणाईला बेधूंद करून गेला. लोकमत आणि प्रीति आयआयटी पिनॅकल यांच्या सहयोगाने मायकल जॅक्सनला नृत्यांजली द्यायला टागयर नागपुरात आला आणि जातांना नागपुरकरांना जिंकून गेला.

टायगर श्रॉफच्या ठेक्यावर थिरकली नागपूरची तरूणाई!
Published: 12 Jul 2017 08:33 PM  Updated: 12 Jul 2017 09:15 PM

खचाखच भरलेले स्टेडियम...टायगर...टायगरच्या आरोळ्या अशा अमाप उत्साहात अभिनेता टायगर श्रॉफ नागपुरच्या तरूणाईला बेधूंद करून गेला. लोकमत आणि प्रीति आयआयटी पिनॅकल यांच्या सहयोगाने  मायकल जॅक्सनला नृत्यांजली द्यायला टागयर नागपुरात आला आणि जातांना नागपूरकरांना जिंकून गेला. टायगरसमवेत अभिनेत्री निधी अग्रवाल आणि गायक सिद्धार्थ महादेव यांनीही  या कार्यक्रमाला चार चांद लावले. ‘मुन्ना मायकल’ या आगामी चित्रपटातील गाण्यांवर थिरकायला टायगर व निधीने तरूणाईला भाग पाडले.  तरूणाईच्या ‘दिलाची धडकन’ असलेल्या टायगरची एक झलक पाहण्यासाठी संध्याकाळी 4 वाजल्यापासून नागपुरातील विभागीय क्रीडा संकुल खचाखच भरले होते. टायगर संकुलात दाखल झाला तसा समोर बसलेल्या हजारोंच्या गर्दीने आपआपल्या मोबाईलचे फ्लॅश लाईट सुरु करून ‘मुन्ना मायकल’ टीमचे अनोखे स्वागत केले. एकाचवेळी जणू हजारो काजवे चमकावेत, असे संकुलातील विहंगम दृश्य डोळ्यांची पारणे फेडणारे होते. नेमक्या याच क्षणाला  स्टेजवर टायगरचे आगमन झाले. आगमनालाच टायगरने मायकल जॅक्सन स्टाईलमध्ये ‘ दिल है आवारा तो ऐतराज क्यों है’ या गाण्यावर ठेका धरला आणि तरूणाईने एकच जल्लोष केला. टायगरच्या साथीला निधी अग्रवाल स्टेजवर आली आणि तरूणाईत आणखीच उत्साह भरला. यानंतर टायगरने नागपूरकरांवर अशी काही जादू केली की, सगळेच जणू मंत्रमुग्ध झाले.

नागपूर ‘वुई लव्ह यू’नागपूरकरांना काय संदेश देशील? असे विचारल्यावर टायगर व निधी या दोघांच्याही तोंडून एकच वाक्य बाहेर पडले. ते म्हणजे, लव्ह यू नागपूर...दोघांनीही नागपूरकरांचे आभार मानले. हा इतका ‘क्राऊड’ मी पहिल्यांदा बघतोय, असे सांगून टायगरने सगळ्यांचे आभार मानले.

सिद्धार्थ महादेवन म्हणाला, दिल है आवारा....सुप्रसिद्ध गायक सिद्धार्थ महादेवन याने ‘दिल है आवारा, तो ऐतराज क्यों है...’ हे गाणे सादर केले. ‘मुन्ना मायकल’चे हे गाणे सिद्धार्थच्या तोंडून लाईव्ह ऐकणे नागपुरकरांना अनोखा आनंद देऊन गेले. शंकर महादेवन हे माझे पिता, गुरु, माझे मार्गदर्शक सगळे काही आहेत. त्यांच्या मुलगा म्हणून दबाव आहेच. पण हा दबाव हवाहवासा आहे. हाच दबाव मला अधिक मेहनत घेण्यासाठी प्रोत्साहन व प्रेरणा देतो, असे सिद्धार्थ यावेळी म्हणाला.

‘बेपरवाह झूमे जा...’‘मुन्ना मायकल’मधील ‘बेपरवाह झूमे जा...’ हे गाणे आज दुपारी रिलीज झाले आणि संध्याकाळी या गाण्यावर टायगर व निधीने नागपूरकरांसमोर लाईव्ह परफॉर्मन्स दिला. नागपूरकरांसाठी हे मोठे सरप्राईज होते. या गाण्याद्वारे टायगरने मायकल जॅक्सनला आगळी-वेगळी ‘नृत्यांजली’ दिली. मायकल जॅक्सनचा उल्लेख टायगरने ‘मायकल जॅक्सन साहेब’ असा केला. यावरून त्याच्या मायकल जॅक्सनवरील प्रेमाची प्रचिती आली.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :