Watch Video : सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’चे पहिले गाणे रिलीज!!

​मित्रांनो प्रतीक्षा संपली असून, दबंग स्टार सलमान खान याच्या ‘ट्यूबलाइट’ या आगामी चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. तुम्ही जर गाणं बघाल तर नक्कीच गाण्याच्या चालीवर तुम्हाला नाचावसे वाटेल.

Watch Video : सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’चे पहिले गाणे रिलीज!!
Published: 16 May 2017 10:29 PM  Updated: 16 May 2017 10:29 PM

मित्रांनो प्रतीक्षा संपली असून, दबंग स्टार सलमान खान याच्या ‘ट्यूबलाइट’ या आगामी चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. तुम्ही जर गाणं बघाल तर नक्कीच गाण्याच्या चालीवर तुम्हाला नाचावसे वाटेल. त्याचबरोबर हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सलमानच्या इतर चित्रपटांप्रमाणेच सुपरहिट ठरेल असेही गाण्याच्या अंदाजावरून दिसून येत आहे. 

काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. ट्रेलरमध्ये स्पष्ट करण्यात आले होते की, सलमान ईदच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटातून बॉक्स आॅफिसवर धमाका करणार आहे. भलेही हा धमाका ईदला होणार असला तरी, त्याची झलक आताच बघायला मिळत असल्याने सलमानचे चाहते सुखावले आहेत. ‘द रेडिओ साँग’ हे गाणे लवकरच रिलीज केले जाणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले होते. त्यानुसार गाणे रिलीज करण्यात आले असून, त्यामध्ये सलमानचा अंदाज बघण्यासारखा आहे. 

अमित मिश्रा यांचा आवाज अन् प्रीतमने कम्पोज केलेले हे गाणे सध्या यू-ट्यूबवर धूम उडवून देत आहे. गाण्यात लाल रंगाचे स्वेटर घातलेला सलमान ‘बजरंगी भाईजान’ची आठवण करून देतो. कारण भोळा-भाबडा दिसत असलेला सलमान सगळ्यांचेच मन जिंकून जातो. खरं तर असाच काहीसा रंग भरणारे गाणे ‘बजरंगी भाईजान’मध्येही बघावयास मिळते. ‘सेल्फी ले ले’मध्येही सलमान असा काहीसा भोळा असल्याचे दिसून येते. सलमानचे हे गाणे प्रचंड हिट झाले होते. लहान मुले तर आजही या गाण्यावर थिरकताना दिसतात. 



सलमान खान दिग्दर्शक कबीर खान याच्याबरोबर हा तिसरा चित्रपट करत आहे. या अगोदर त्याने ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांमध्ये काम केले. हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे या दोघांच्या तिसºया चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरता होती. शिवाय हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरेल असेही काहीसे चिन्ह सध्या दिसत आहेत. 

दरम्यान, ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपटात १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धावर आधारित आहे. सलमान खान याच्या व्यतिरिक्त चित्रपटात त्याचा लहान भाऊ सोहेल खान, चायनीज अभिनेत्री जू जू आणि स्वर्गीय ओम पुरी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सध्या सलमान या चित्रपटाच्या प्रमोशनबरोबरच त्याच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :