प्रभासच्या बॉलिवूड लान्चिंगची तयारी! करण जोहर अन् राजमौली सज्ज!!

‘बाहुबली’ प्रभास बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली असू शकते? प्रभास बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. केवळ प्रभासच नाही तर करण जोहर आणि ‘बाहुबली’ दिग्दर्शक एस. एस. राजमौली हेही प्रभासच्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहेत.

प्रभासच्या बॉलिवूड लान्चिंगची तयारी! करण जोहर अन् राजमौली सज्ज!!
Published: 18 Apr 2017 11:58 AM  Updated: 18 Apr 2017 11:58 AM

‘बाहुबली’ प्रभास बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार, यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली असू शकते? सूत्रांचे खरे मानाल तर, प्रभास बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. केवळ प्रभासच नाही तर करण जोहर आणि ‘बाहुबली’ दिग्दर्शक एस. एस. राजमौली हेही प्रभासच्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहेत. करण जोहर आणि राजमौली यांनी प्रभासला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची तयारी सुरु केली आहे. या चित्रपटात प्रभास अ‍ॅक्शन आणि रोमान्स दोन्ही करताना दिसेल.
गेल्या पाच वर्षांपासून प्रभास ‘बाहुबली’मध्ये बिझी आहे. यादरम्यान त्याने बॉलिवूडच्या अनेक बड्या बॅनर्सला नकार दिला. पण आता ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली2’नंतर प्रभासने दुसºया प्रोजेक्टवर काम करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, प्रभासला प्रोत्साहन देण्यासाठी खुद्द करण जोहर पुढे सरसावला आहे. करण एका हिंदी चित्रपटाची निर्मिती करणार आहे आणि राजमौली करणचा हा चित्रपट डायरेक्ट करणार आहेत. या चित्रपटात प्रभास एका नव्या रूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

ALSO READ : ​‘बाहुबली2’च्या रिलीजपूर्वीच सरप्राईज झाले Leaked!

तूर्तास प्रभास ‘बाहुबली2’च्या रिलीजची प्रतीक्षा करतोय. ‘बाहुबली’च्या या सीक्वलमध्ये अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, राणा डग्गुबती, सत्यराज यासारखे अनेक कलाकार आहेत.  ‘बाहुबली2’ हा यंदाचा सर्वात मोठा चित्रपट आहे. चित्रपटाच्या बजेटपासून तर यातील व्हिज्युअल इफेक्ट्स सगळेच काही भव्यदिव्य आहे. केवळ इतकेच नाही तर चित्रपटाचा कालावधीही मोठा आहे. होय,  ‘बाहुबली2’ २ तास ५० मिनिटांचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा पहिला भाग अर्थात  ‘बाहुबली: दी बिगनींग’ हा सिनेमा २ तास ३८ मिनिटांचा होता. आता या उण्यापुºया तीन तासांच्या चित्रपटात राजमौली काय काय दाखवतात, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :