​सलमान खानचे ‘लकी ब्रेसलेट’ गायब! धारण केले ‘तावीज’!!

बॉलिवूडचा ‘सुल्तान’ कायम आपल्या लकी ब्रेसलेटसोबतच दिसतो. भाईजानसाठी हे ब्रेसलेस लकी चार्मसारखे काम करते. पण आता हा लकी चार्म सलमानने स्वत:पासून दूर केलाय. होय, सलमानच्या हातात सध्या हे ब्रेसलेट नाही.

​सलमान खानचे ‘लकी ब्रेसलेट’ गायब! धारण केले ‘तावीज’!!
Published: 03 Jul 2017 02:05 PM  Updated: 03 Jul 2017 02:05 PM

बॉलिवूडचा ‘सुल्तान’ कायम आपल्या लकी ब्रेसलेटसोबतच दिसतो.  भाईजानसाठी हे ब्रेसलेस लकी चार्मसारखे काम करते. पण आता हा लकी चार्म सलमानने स्वत:पासून दूर केलाय. होय, सलमानच्या हातात सध्या हे ब्रेसलेट नाही. आता याचे कारण काय, हे दाव्यानिशी सांगता येणार नाही. पण कदाचित यामागे ‘ट्यूबलाईट’चे अपयश तर कारणीभूत नसेल? ‘ट्यूबलाईट’कडून सलमानला बºयाच अपेक्षा होत्या. या चित्रपटाचे सलमानने जोरदार प्रमोशन केले होते. पण सलमानच्या सगळ्या अपेक्षा पाण्यासोबत वाहून गेल्यात आणि ‘ट्यूबलाईट’ बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. सलमानसाठी हे सगळेच निराशाजनक आहे. कदाचित यानंतर सलमानने हे ब्रेसलेट आपल्यापासून दूर केले असावे. 





तुमच्या माहितीसाठी सांगतोय, तर हे बे्रसलेस सलमानला त्याच्या वडिलांनी म्हणजेच सलीम खान यांनी दिले आहे. पण कदाचित या ब्रेसलेटमधील ‘लकी चार्म’ हरवलाय. त्यामुळेच आता सलमानने एक ‘तावीज’ धारण केले आहे. काल सलमानच्या हातात त्याचे लकी ब्रेसलेट नव्हते तर गळ्यात हे ‘तावीज’ होते. काल सलमान विमानतळावर दिसला. ब्लॅक पॅन्ट व ब्लॅक टी-शर्टवर सलमानने हे ‘तावीज’ धारण केले होते. त्याचे हे लूक त्याच्या अपकमिंग ‘टायगर जिंदा है’मधील आहे, हे तर आम्हाला ठाऊक आहे. पण हातात लकी ब्रेसलेट नाही, म्हणूनच अनेकांचे लक्ष सलमानच्या गळ्यातील ‘तावीज’कडे गेले.
‘टायगर जिंदा है’मध्ये सलमानसोबत कॅटरिना कैफ दिसणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. ‘एक था टायगर’ सुपरहिट ठरला होता. आता याचा सीक्वल सलमानला किती यश मिळवून देतो, ते बघूयात!


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :