​शाहरूख नाही, सुहानावर खिळल्या सर्वांच्या नजरा!

काल रात्री किंगखान शाहरूख खान नाही तर त्याची लाडकी लेक सुहाना खान हिच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या. होय, गौरी खान हिने डिझाईन केलेल्या एका हॉटेलच्या ग्रॅण्ड ओपनिंगला शाहरूख व सुहाना एकत्र पोहोचले.

​शाहरूख नाही, सुहानावर खिळल्या सर्वांच्या नजरा!
Published: 19 Jun 2017 10:45 AM  Updated: 19 Jun 2017 10:49 AM

काल रात्री किंगखान शाहरूख खान नाही तर त्याची लाडकी लेक सुहाना खान हिच्यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या. होय, गौरी खान हिने डिझाईन केलेल्या एका हॉटेलच्या ग्रॅण्ड ओपनिंगला शाहरूख व सुहाना एकत्र पोहोचले. यावेळी सुहाना कमालीची सुंदर दिसत होती. शाहरूख व सुहाना  आलेत आणि लगेच कॅमेºयांचा झगमगाट झाला. मात्र यावेळी सगळ्या कॅमे-याच्या केंद्रस्थानी केवळ आणि केवळ सुहाना होती. या रेस्टारंट ओपनिंग इव्हेंटला केवळ शाहरूख व सुहानाच नाही तर फराह खान, अर्जुन कपूर, अनिल कपूर, आलिया भट्ट असे सगळेच आलेत. पण यात सुहाना या सगळ्यांमध्ये भाव खावून गेली.







काही दिवसांपूर्वी सुहानाचा बिकनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत सुहानाशिवाय चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे, संजय कपूरची मुलगी शनाया कपूर अशा सगळ्याच दिसल्या होत्या.
सुहाना सध्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतेय. डान्सिंग आणि स्पोर्ट तिचे आवडीचे विषय. सुहानाने एक डान्सर म्हणून नाव कमवावे, असे शाहरूखला वाटतेय. अर्थात सुहानाने अभिनय क्षेत्रात यावे, यालाही शाहरूखची ना नाहीय. तसेही सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत. अलीकडे शाहरूखची लाडकी लेक सुहाना एक उत्तम अभिनेत्री बनणार, मोठे नाव कमावणार, असे भाकीत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी  यांनी वर्तवले होते. 



ALSO READ : ...तर ही आहे शाहरुख खानची मुलगी ‘सुहाना’ची लाइफस्टाइल !

‘माझे शब्द लक्षात ठेव. सुहाना खान ही पुढे जाऊन एक चांगली अभिनेत्री होणार. मी तिचे काही व्हिडिओ बघितले आहेत. तिने खूप छान अभिनय केलाय,’असे टिष्ट्वट शबाना यांनी  शाहरूखला उद्देशून केले आहे.  शबाना यांचे हे शब्द ऐकून शाहरूखचा ऊर भरून आला होता.  तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात. तुमच्या या विश्वासानंतर नक्कीच छोटीला प्रेरणा मिळेल, अशा शब्दांत त्याने शबानांचे  आभार मानले होते.


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :