​समलैंगिकतेच्या मुद्यावर सोनम कपूरचा श्री श्रींना थेट सवाल! वाचा सविस्तर!!

समलैंगिकतेच्या मुद्यावर सोनम कपूरने ठोस भूमिका घेत, थेट आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनाच आव्हान दिले आहे.

​समलैंगिकतेच्या मुद्यावर सोनम कपूरचा श्री श्रींना थेट सवाल! वाचा सविस्तर!!
Published: 14 Nov 2017 06:59 PM  Updated: 14 Nov 2017 06:59 PM

समलैंगिकतेच्या मुद्यावर सोनम कपूरने ठोस भूमिका घेत, थेट आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनाच आव्हान दिले आहे. होय, धर्मगुरूंना समलैंगिकतेच्या मुद्यावर समस्या का? असा थेट सवाल तिने केला आहे. विशेष म्हणजे, यात तिला अभिनेत्री आलिया भट्ट हिचाही पाठींबा मिळाला.
अलीकडे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात श्री श्री रविशंकर यांनी समलैंगिकतेसंदर्भात   वक्तव्य केले होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, समलैंगिकता एक प्रवृत्ती आहे आणि ती स्थायी नाही, असे ते म्हणाले होते. मी अशा अनेकांना ओळखतो जे आधी ‘गे’ होते. पण आता सामान्य आहेत. मी अशांनाही ओळखतो जे आधी पूर्णपणे नॉर्मल होते आणि आता समलैंगिक बनले आहेत, असेही रविशंकर म्हणाले होते. पण रविशंकर यांचे हे मत कदाचित सोनमला पचले नाही आणि तिने थेट  ट्विटरवर याला विरोध नोंदवला.‘होमोसेक्युअ‍ॅलिटी कुठलीही प्रवृत्ती नाही. तर ती जन्मजात बाब आहे आणि अगदी सामान्य आहे,’ असे तिने लिहिले. ‘धर्मगुरुंना शेवटी अडचण काय आहे? तुम्हाला हिंदुत्व वा संस्कृतीबद्दल काही शिकायचे असेल तर यांच्याऐवजी अन्य लोकांना फॉलो करणे उत्तम आहे,’ असेही सोनमने लिहिले,
ट्विटमध्ये ठेंगा दाखवणारी चिन्हं वापरत तिने नाराजी व्यक्त केली. सोनमप्रमाणेच अभिनेत्री आलिया भट्टनेही रविशंकर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. सोनमचे हे  ट्विट आलिया भट्टने रिट्विट करत, तिला पाठींबा दर्शवला. आलियाने सोनमला टॅग करत, हे खूपच विचित्र आहे, असे ट्विट केले.
सोनमने तिचे मत मांडताच अनेकांनीच तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. ‘तुला त्यांच्याबद्दल (रविशंकर) काही माहिती तरी आहे का? ‘निळ्या रंगाची टिक’ मिळाली आहे, तर उगाचच काहीही बरळू नकोस’, असे एका युजरने म्हटले. तर एका युजरने म्हटले, ‘तू सिद्ध केलंस की सौंदर्य आणि बुद्धिमत्ता हे समीकरण कधीही एकत्र पाहायला मिळत नाही’. 

ALSO READ: बॉलिवूडमधील ही अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बेडीत

 खरे सांगायचे तर सोनमला याने काहीही फरक पडत नाही. कारण पूर्वापार बेधडक बोलणारी अभिनेत्री अशीच तिची ओळख राहिलेली आहे. सोनमने वेळोवेळी तिच्या या स्वभावाचे दर्शन घडवले आहे. याहीवेळी तिने हेच केले. आपल्या बेधडक स्वभावाप्रमाणेच बेधडक विचार मांडलेत. तुम्हाला सोनमचे विचार किती पटतात, ते नक्की कळवा. खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया लिहू शकता.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :