सुशांत सिंह राजपूत अन् अंकिता लोखंडे दिसले कॉफी शॉपमध्ये! वाचा, काय आहे प्रकरण!!

ब्रेकअपनंतर सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे कधीच एकत्र दिसले नाहीत. पण गेला रविवार वेगळाच उगवला. या रविवारी सुशांत सिंह राजपूत व अंकिता लोखंडे एका कॉफी शॉपमध्ये एकत्र दिसून आले.

सुशांत सिंह राजपूत अन् अंकिता लोखंडे दिसले कॉफी शॉपमध्ये! वाचा, काय आहे प्रकरण!!
Published: 08 May 2017 12:32 PM  Updated: 08 May 2017 12:32 PM

एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या बॉलिवूड कपलचे ब्रेकअप होते आणि  ब्रेकअपनंतरही ते एकमेकांचे चांगले मित्र बनून राहतात, अशी उदाहरणे इंडस्ट्रीत कमी नाहीत. आता या उदाहरणांमध्ये कदाचित सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे या दोन एक्स लव्हर्सचेही नाव घेता येईल.  
खरे तर ब्रेकअपनंतर सुशांत व अंकिता कधीच एकत्र दिसले नाहीत. पण गेला रविवार वेगळाच उगवला. या रविवारी सुशांत सिंह राजपूत व अंकिता लोखंडे एका कॉफी शॉपमध्ये एकत्र दिसून आले. आता दोघांच्या या भेटीमागचे कारण तर आम्हाला ठाऊक नाही. दोघेही मित्र म्हणून भेटले की दोघांमध्ये आणखीच काही शिजतेय, हे लवकरच कळेल. पण तूर्तास या भेटीनंतर दोघांच्या पॅचअपच्या बातम्यांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. 

ALSO READ : सुशांतसिंग राजपूत अन् क्रिती सॅननच्या रिलेशनशिपचा हा घ्या पुरावा!

मध्यंतरी अंकिता सुशांतसोबत पॅचअपचे प्रयत्न करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता हे खरे असेल तर या प्रयत्नांना किती यश मिळेल,याबाबत आम्ही जरा साशंकच आहोत. कारण सुशांत व क्रिती सॅनन या दोघांची अलीकडे वाढलेली जवळीक बघता, आमची साशंकता वाढली आहे.  सहा वर्षांच्या सुंदर आणि स्थिर रिलेशनशिपनंतर सुशांत सिंह राजपूत व अंकिता लोखंडे या दोघांमध्ये अचानक काहीतरी बिनसले आणि दोघेही परस्परांपासून वेगळे झाले होते. खरे तर ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवर भेटलेले हे लव्हबर्ड्स कधीकाळी वेगवेगळ्या वाटांना जातील, असे कुणालाही वाटले नव्हते. पण तसे झाले. अंकिताचा चिडका, संशयी स्वभाव आणि तिचे वाढते दारूचे व्यसन यामुळे सुशांतने तिला सोडल्याची चर्चा यानंतर रंगली होती. पण असे काहीही नसल्याचे खुद्द सुशांतनेच स्पष्ट केले होती. यानंतर सुशांत व क्रिती सॅनन यांच्या अफेअरच्या बातम्याही तितक्याच रंगल्या होत्या. अलीकडे तर सुशांत व क्रिती परस्परांच्या अतिच जवळ आल्याचे दिसतेय.


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :