सोनाक्षी सिन्हा मालदीव्ह्ज बेटावर एन्जॉय करतेय व्हॅकेशन्स!

​वाढत्या वजनाच्या बाबतीत चर्चेत असणारी सोनाक्षी सिन्हा हिने तिचे वजन कमी करून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीय. मालदीव्ह्ज येथे व्हॅकेशन्सवर असतानाचे काही स्लिम फिट सेल्फी तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

सोनाक्षी सिन्हा मालदीव्ह्ज बेटावर एन्जॉय करतेय व्हॅकेशन्स!
Published: 08 Feb 2017 03:30 PM  Updated: 08 Feb 2017 03:30 PM

‘बॉलिवूडची दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती मालदीव्ह्ज बेटावर व्हॅकेशन्स एन्जॉय करायला गेली असून तिथे तिने क्लिक केलेल्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आहे. तिने घेतलेल्या या सेल्फीत ती अतिशय स्लिम फिट दिसते आहे. तिने घातलेला पांढऱ्या रंगाचा टीशर्ट तिला स्लिम फिटमुळे अधिकच खुलून दिसतो आहे. काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिने तिच्या आगामी चित्रपटासाठी तिचे वजन कमी केले आहे, असे नाही का वाटत तुम्हाला? 

ALSO READ : Sonakshi Sinha-Siddharth Malhotra work together : सोनाक्षीची भूमिका नकारात्मक

                            

ALSO READ : Hotness Alert : रॅम्पवर सोनाक्षी सिन्हाच्या ‘या’ सेक्सी अदा!

सोनाक्षी सिन्हा ही थोड्याच दिवसात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत ‘इत्तेफाक’ या आगामी चित्रपटाची शूटींग सुरू करणार आहे. त्याअगोदर थोडासा विरंगुळा म्हणून ती ‘मालदीव्ह्ज’ येथे मिनी व्हॅकेशनसाठी गेली आहे. फोटोसेशन आवडत असलेली सोनाक्षी येथील निसर्ग पाहून सौंदर्याच्या प्रेमातच पडली. मग काय? तिने स्वत:चेच सेल्फी काढायला सुरूवात केली. १९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्डर मिस्ट्री’ आधारित ‘इत्तेफाक’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये सोनाक्षी सिन्हा ही सिद्धार्थ मल्होत्रासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच तिने मुंबईत जर्मन सिनेमॅटोग्राफर मायकेल लुका आणि सिद्धार्थ यांच्यासोबत काही लुक टेस्ट दिल्या. या चित्रपटात ती ‘नंदा’ची भूमिका साकारणार असून मुळ व्यक्तीरेखेपेक्षा तिची व्यक्तीरेखा किंचितशी वेगळी असणार असल्याचे कळते आहे. २० फेबु्रवारीपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याचे सुत्रांक डून कळतेय.

हाफ गर्लफ्रेंड हिंदी मीडियमवर भारी पडेल असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :