​शिल्पा शेट्टी व राज कुंद्राचा संताप अनावर...ठोकला १०० कोटींचा दावा!

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा या दोघांचे नाव गेल्या काही दिवसांपासून एका फसवणुकीच्या आरोपांवरून चर्चेत आहे. आता या प्रकरणाला एक वेगळे वळण आले आहे. होय, शिल्पा व राज कुंद्रा यांनी एका व्यापाºयावर १०० कोटी रूपयांचा अबु्रनुकसानीचा दावा ठोकला आहे

​शिल्पा शेट्टी व राज कुंद्राचा संताप अनावर...ठोकला १०० कोटींचा दावा!
Published: 17 May 2017 12:17 PM  Updated: 17 May 2017 12:17 PM

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा या दोघांचे नाव गेल्या काही दिवसांपासून एका फसवणुकीच्या आरोपांवरून चर्चेत आहे. आता या प्रकरणाला एक वेगळे वळण आले आहे. होय, शिल्पा व राज कुंद्रा यांनी एका व्यापाºयावर १०० कोटी रूपयांचा अबु्रनुकसानीचा दावा ठोकला आहे.  काही दिवसांपूर्वीच या व्यापाºयाने  शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरोधात २४ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. रवि मोहनलाल भलोटिया असे या व्यापा-याचे नाव आहे. आता भलोटियाविरोधात  शिल्पा व राजने अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. 
शिल्पा, राज कुंद्रा यांनी अन्य तिघांसोबत मिळून  (दर्शित इंद्रवदन शाह, उदय कोठारी, वेदांत बाली)आपल्याला २४ लाखांचा गंडा घातल्याचा कापड व्यापारी रवि मोहनलाल भलोटिया याचा आरोप आहे. या सर्वांनी मिळून आपल्या नावाने पैसे घेतले खरे पण, ते पैसे काही आपल्यापर्यंच आलेच नाहीत, असा आरोप भलोटियाने केला होता. इतकेच नाही  राज आणि शिल्पा यांच्याबद्दल जाहिररित्या काही अपशब्द आणि अपमानास्पद वक्तव्य केली होती. काही दिवसांपासून हे प्रकरण बरेच चर्चेत आहे.

ALSO READ : भांग पिलेल्या शेल्पी शेट्टीचा ‘नागीण’ डान्स तुम्ही पाहिला का?

 शिल्पा शेट्टी व उद्योगपती राज कुंद्रा या दाम्पत्याने ‘बेस्ट डील’ कंपनीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात देशभरातील अनेक व्यापा-यांना फसवले असल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा व राजने व्यापा-यांना सुमारे १८ कोटी रुपयांनी गंडा घातल्याचा संशय आहे. पोलीस चौकशीत खरी माहिती बाहेर येईल, असे भलोटिया म्हणाला होता. या पार्श्वभूमीवर  राज कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करत भलोटियाविरोधात १०० कोटींचा अबु्रनुकसानीचा दावा ठोकला आहे.


पब्लिसिटीसाठी इशा गुप्ता करतेय का बोल्ड फोटोशूट?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :