​शाहरूख खान बनला ‘प्रोटेक्टिव्ह डॅड’; सुहानाला केले विमानतळावर ड्रॉप!

रविवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर काहीसे असेच चित्र होते. शाहरूख त्याच्या लाडकी लेकीला ड्रॉप करण्यासाठी आला होता. विमानतळावरील त्याच्या व सुहानाच्या फोटोंतून केवळ एकच दिसले, ते म्हणजे शाहरूख एक प्रोटेक्टिव डॅड आहे.

​शाहरूख खान बनला ‘प्रोटेक्टिव्ह डॅड’; सुहानाला केले विमानतळावर ड्रॉप!
Published: 15 May 2017 12:39 PM  Updated: 15 May 2017 12:39 PM

शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना त्याची जीव की प्राण आहे. कदाचित त्याचमुळे सुहानाच्या प्रत्येक वागण्या-बोलण्याकडे शाहरूख लक्ष देतो. आर्यन व अबराम हे शाहरूखचे दोन हात आहे. पण सुहाना?  सुहानाचे स्थान शाहरूखच्या हृदयात आहे. तळहातावरच्या फोडाप्रमाणे तो तिला जपतो. सुहानालाही तिच्या भावांइतकेच स्वातंत्र्य आहे. पण अनेकदा अतिकाळजीपोटी सुहानप्रती शाहरूख काहीसा हळवा होताना दिसतो. रविवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर काहीसे असेच चित्र होते. शाहरूख त्याच्या लाडकी लेकीला ड्रॉप करण्यासाठी आला होता. विमानतळावरील त्याच्या व सुहानाच्या फोटोंतून केवळ एकच दिसले, ते म्हणजे शाहरूख एक प्रोटेक्टिव डॅड आहे. म्हणूनच तर आपली सगळी कामे बाजूला ठेवून तो सुहानाला सी आॅफ करण्यासाठी आला होता.





शाहरूख व सुहाना विमानतळावर दाखल होताच, लोकांनी एकच गर्दी केली. या बाप-लेकीला पाहण्यासाठी आणि त्यांची एक छबी आपल्या कॅमेºयात टीपण्यासाठी एकच झुंबड उडाली. मग काय, सुहानाला कार मधून उतरल्यापासून पूर्णवेळ शाहरूख तिला प्रोटेक्ट करताना दिसला. मीडियापासून सुहानाला दूर ठेवण्यासाठीची त्याची धडपडही यावेळी दिसली. गेल्या काही दिवसांपासून सुहाना सोशल मीडियावर बरीच ट्रेंड होतेय. शाहरूख यावरून बराच चिंतीत दिसतो.





ALSO READ : सुहाना पोहोचली करण जोहरच्या घरी? ही बॉलिवूड डेब्यूची तयारी तर नाही?

सुहानाला अभिनय प्रचंड आवडतो. ती थिएटरही करीत आहे. शाहरूखने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, जर सुहाना माझ्यापेक्षा पाच पटीने काम करण्याची तयारी ठेवत असेल अन् त्यानंतरही दहा पटीने कमी मानधन घेण्यास तयार असेल तर ती अभिनेत्री बनू शकते. मला असे वाटतेय की तिने अभिनेत्रींना होताना प्रत्येक संकटाचा सामना करायला हवा. माझ्या सहयोगी अभिनेत्री ज्या पद्धतीने स्ट्रगल करून स्वत:ला सिद्ध करतात अगदी त्याच पद्धतीने तिनेही त्या सर्व अडचणींवर मात करणे अपेक्षित आहे. यासाठी जर तिची तयारी असेल तरच तिने अभिनय क्षेत्रात काम करण्याचा विचार करावा.


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :