​शबाना आझमींच्या संस्थेसाठी शाहरुख,अनुष्का करणार रॅम्पवॉक

मिजवानच्या या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री अनुष्का शर्मा हे रॅम्पवॉक करणार असून त्यांचा हा शो ५ मार्च रोजी आयोजित केला जाणार आहे. ​

​शबाना आझमींच्या संस्थेसाठी शाहरुख,अनुष्का करणार रॅम्पवॉक
Published: 28 Feb 2017 09:36 PM  Updated: 28 Feb 2017 09:36 PM

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान व अभिनेत्री अनुष्का शर्मा हे लवकरच रॅम्प वॉक करताना दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांच्या ‘मिजवान’ या चॅरिटेबल संस्थेसाठी आयोजित या शोसाठी दोघेही एकत्र येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या फॅशन शो साठी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांने वस्त्रे डिझाईन केली असल्याचे सांगण्यात येते. 

अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांचे वडील प्रसिद्ध साहित्यिक व बॉलिवूड गीतकार कैफी आझमी यांच्या स्मृतीत स्थापन केलेल्या मिजवान वेलफेअर सोसायटी (एमडब्ल्यूएस) या संस्थेचे नाव मिजवान या गावाच्या नावावर आहे. या संस्थेच्या माध्यमातून या भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. येथील मलमली व सुती कपड्यांवर करण्यात येणारे ‘चिकनकारी एम्ब्रॉयडरी’ वर्क्स प्रसिद्ध आहे. या संस्थेचे संचालनाची जबाबदारी खुद्द शबाना आझमी व प्रसिद्ध उद्योजक नरेश गोयल यांची मुलगी नम्रता यांनी उचलली आहे. 



नम्रता गोयल हिने पीटीआयशी बोलताना सांगितले की, मिजवान येथील प्रत्येक मुलगी आज उद्योजक, काम्प्युट इंजिनीअर किंवा सुपरमॉडेल होण्याचे स्वप्न पाहत आहे. महिला व पुरुषांत समानता यावी या माध्यमातून आम्ही काम करीत असून या चळवळीला सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आपला देश बदलत असल्याचे हे प्रतिक आहे. मिजवानच्या या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री अनुष्का शर्मा हे रॅम्पवॉक करणार असून त्यांचा हा शो ५ मार्च रोजी आयोजित केला जाणार आहे. 

शाहरुख खान व अनुष्का शर्मा यांची जोडी दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या आगामी ‘रहनुमा’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप फायनल नसले तरी रहनुमा हे नाव कायम असेल असे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात शाहरुख खान अनुष्का शर्माच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येते.  

सरोगसी पद्धतीने कुंवारा बाप होण्याचा बॉलिवूडमध्ये ट्रेंड आला आहे का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :