संजय दत्तने सपत्निक केली विघ्नहर्त्याची आरती, पहा फोटो!

​दरवर्षी बॉलिवूडमध्ये गणपती बाप्पाच्या जल्लोषात स्वागत केले जात असते. यावर्षीही लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी बॉलिवूडकर सज्ज झाले आहे.

संजय दत्तने सपत्निक केली विघ्नहर्त्याची आरती, पहा फोटो!
Published: 23 Aug 2017 10:48 PM  Updated: 23 Aug 2017 10:48 PM

दरवर्षी बॉलिवूडमध्ये गणपती बाप्पाच्या जल्लोषात स्वागत केले जात असते. यावर्षीही लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी बॉलिवूडकर सज्ज झाले आहे. अशात संजय दत्त मागे कसा राहू शकेल? संजू बाबा आणि पत्नी मान्यता दत्त यांचे काही फोटोज् समोर आले असून, ज्यामध्ये ते बाप्पाची मनोभावे आरती करताना बघावयास मिळत आहेत. येत्या शुक्रवारी श्री गणेशाचे घरोघरी आगमन होणार आहे. याअगोदरच संजूबाबा पत्नी मान्यतासोबत मुंबईतील लोखंडवाला येथील एका गणपती मंदिरात बघावयास मिळाले. यावेळी संजूबाबाने सपत्निक श्रीगणेशाचे मनोभावे आरती केली. 





आरती केल्यानंतर दोघेही बराच वेळ विघ्नहर्तासमोर हात जोडून उभे होते. संजूबाबा आणि त्याची पत्नी यावेळी ट्रेडिशनल आउटफिटमध्ये बघावयास मिळाले. आरती म्हणताना संजूबाबा खूपच लिन झाला होता. आयोजकांनीही दोघांचे जल्लोषात स्वागत केले. संजूबाबा सध्या त्याच्या आगामी ‘भूमी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शिक्षा भोगून कारागृहात बाहेर आल्यानंतर संजूबाबा ‘भूमी’मधून कमबॅक करीत आहे. चित्रपट मुलगी आणि वडिलांच्या नात्यावर आधारित आहे. त्यामुळे हा एक संवेदनशिल चित्रपट आहे. चित्रपटात संजूबाबाने वडिलांची तर आदिती राव हैदरी हिने मुलीची भूमिका साकारली आहे. 





गेल्या बुधवारी या चित्रपटातील पहिले रोमॅण्टिक गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याला राहत फतेह अली खान यांनी गायिले असून, गाण्यात आदिती आणि सिद्धांतची केमेस्ट्री बघावयास मिळते. गाण्याला सचिन जिगर याने कंपोज केले आहे. गाण्याचे पिक्चरायजेशन खूपच सुंदर आहे. गाण्याला आग्रातील ताजमहल परिसरात शूट करण्यात आले आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. 
 


दरम्यान, ‘भूमी’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये संजूबाबा दमदार भूमिकेत बघावयास मिळतो. वास्तविक ट्रेलरची सुरवातच संजूबाबाच्या गणपती आरतीने होते. हा चित्रपट येत्या २२ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. 


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :