​बोल्ड सीन्स अन् शिव्याची भरमार असलेला ‘कालाकांडी’चा ट्रेलर रिलीज

आपले नशीब आजमावण्यासाठी सैफ पुन्हा एकदा येत आहे. होय, सैफचा ‘कालाकांडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.

​बोल्ड सीन्स अन् शिव्याची भरमार असलेला ‘कालाकांडी’चा ट्रेलर रिलीज
Published: 07 Dec 2017 11:27 AM  Updated: 07 Dec 2017 11:27 AM

अभिनेता सैफ अली खानचे नशिब अलीकडे रूसून बसले आहेत. अलीकडच्या काळात सैफचा एकही चित्रपट बॉक्सआॅफिसवर कमाल दाखवू शकलेला नाही. काही महिन्यांपूर्वी आलेला ‘शेफ’ हा त्याचा चित्रपटही बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला. पण यानंतरही सैफने हिंमत सोडलेली नाही. आपले नशीब आजमावण्यासाठी सैफ पुन्हा एकदा येत आहे. होय, सैफचा ‘कालाकांडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.
‘कालाकांडी’ हा चित्रपट एक डार्क कॉमेडी थ्रीलर आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात ७३ कट्स सांगितले होते. आता ते का? याचे उत्तर आपल्याला ट्रेलरमध्ये मिळते. होय, ‘कालाकांडी’च्या ट्रेलरमध्ये बोल्ड सीन्स आणि शिव्यांची भरमार आहे. सैफ कॅन्सरने पीडित असल्याचे ट्रेलरमध्ये दिसते.  सैफला पोटाचा कॅन्सर असल्याचे निदान होते. तुला आनंद मिळेल, त्या सगळ्या गोष्टी कर, असे डॉक्टर त्याला सांगतात. नंतर सैफ वेगवेगळ्या झोनमध्ये जातो, असे ट्रेलरमध्ये दिसते. याचदरम्यान ट्रेलरमध्ये दीपक डोबरियाल आणि विजय राज यांची एन्ट्री दाखवली आहे. हे दोघेही पैशाचे लोभी असतात. शोभिता धुलिपाला आणि कुणाल राय कपूर यांचे प्रेम आणि अक्षय ओबेरॉय याची वासना हेही ट्रेलरमध्ये दिसते. चित्रपटाचे ट्रेलर कुठेतरी तुम्हाला ‘डेल्ही बेली’ची आठवण करून देतो. पण सुरवातीपासूनच ट्रेलर तुम्हाला बांधून ठेवतो आणि पूर्ण बघण्यासाठी प्रवृत्त करतो. सैफची विचित्र हेअरस्टाईल, त्याचे फरकोटमधील लूक सगळेच तुमच्या मनात उत्सुकता निर्माण करते.

ALSO READ : लग्नासाठी करिना कपूर खानने सैफ अली खानला घातली होती ही अट

‘कालाकांडी’ आधी यावर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज होणार होता. मात्र आता तो येत्या १२ जानेवारीला रिलीज होत आहे.  या चित्रपटाद्वारे अक्षत वर्मा डायरेक्शन डेब्यू करतो आहे. यापूर्वी अक्षतने ‘डेल्ही बेली’ची पटकथा लिहिली होती. या चित्रपटात सैफशिवाय कुणाल राय कपूर, विजय राज, अमायरा दस्तूर, अक्षय ओबेरॉय, इशा तलवार, नील भूपलम, शिवम पाटील आदी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :