प्रादेशिक चित्रपटांचा वाढता वरचष्मा

प्रादेशिक चित्रपटांचा वाढता वरचष्मा नंदिनी मानसिंगका संस्थापिका, डिजीबुस्टर कंपनी चित्रपट उद्योग हा भारतातील सर्वात जुना आणि मोठा उद्योग आहे. १९१३ साली दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर भारतीय चित्रपट उद्योगाने भरारी घेतली. आपला चित्रपट उद्योग ‘बॉलीवूड’ या नावाने ओळखला जातो. दरवर्षी एक हजाराहून अधिक चित्रपट निर्माण होतात. तथापि, सध्या बॉलीवूड एका वेगळ्याच गर्तेत सापडलाय. ‘स्टार सिस्टीम’ या नावाची नवीन कन्सेप्ट आली आहे, ज्यात ‘नो कन्टेन्ट’ पद्धतीचे सिनेमे निघत आहेत. किमान परतावा मिळावा या उद्देशाने निर्माते अशा विश्वासू अभिनेत्यांना चित्रपटात घेत आहेत. आपल्या ठराविक बजेटपेक्षा अधिक रक्कम मिळावी हा यामागचा उद्देश असतो. अशा स्थितीत चित्रपट उद्योगात खूप स्पर्धा निर्माण झाली आहे. निर्माते हे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मोठी रक्कम खर्ची टाकत आहेत आणि स्टार्सनाही मोठी रक्कम अदा करीत आहेत. पैसे वसूल झाले पाहिजेत, हा बॉलीवूड निर्मात्यांचा उद्देश आहे.

प्रादेशिक चित्रपटांचा वाढता वरचष्मा
Published: 19 Oct 2016 12:35 AM  Updated: 19 Oct 2016 12:35 PM

चित्रपट उद्योग हा भारतातील सर्वात जुना आणि मोठा उद्योग आहे. १९१३ साली दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर भारतीय चित्रपट उद्योगाने भरारी घेतली. आपला चित्रपट उद्योग ‘बॉलीवूड’ या नावाने ओळखला जातो.  दरवर्षी एक हजाराहून अधिक चित्रपट निर्माण होतात.
तथापि, सध्या बॉलीवूड एका वेगळ्याच गर्तेत सापडलाय. ‘स्टार सिस्टीम’ या नावाची नवीन कन्सेप्ट आली आहे, ज्यात ‘नो कन्टेन्ट’ पद्धतीचे सिनेमे निघत आहेत. किमान परतावा मिळावा या उद्देशाने निर्माते अशा विश्वासू अभिनेत्यांना चित्रपटात घेत आहेत. आपल्या ठराविक बजेटपेक्षा अधिक रक्कम मिळावी हा यामागचा उद्देश असतो. अशा स्थितीत चित्रपट उद्योगात खूप स्पर्धा निर्माण झाली आहे. निर्माते हे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मोठी रक्कम खर्ची टाकत आहेत आणि स्टार्सनाही मोठी रक्कम अदा करीत आहेत.  पैसे वसूल झाले पाहिजेत, हा बॉलीवूड निर्मात्यांचा उद्देश आहे.
प्रादेशिक चित्रपटांचा विचार करता, अशा चित्रपटांमध्ये आता दिसू शकेल असा बदल जाणवत आहे. यापूर्वी प्रादेशिक चित्रपटांना फारसे महत्त्व देण्यात येत नव्हते. गतकाळी नावे ठेवणाºया विचारांना मागे सारुन प्रादेशिक चित्रपटाचे आता दिवसेंदिवस महत्त्व वाढते आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षात प्रादेशिक चित्रपटांची संख्या सुमारे दुप्पट झाली आहे. (२०१२-२०१३ साली ९८० चित्रपट निर्माण झाले, २०१५-१६ या साली १९०२ चित्रपट निर्माण झाले) यामागची कारणे वेगवेगळी आहेत. मर्यादित बजेट, स्टार्सचे फारसे नसलेले नखरे आणि विविध श्रेणीतील कलाकार मिळणे यांचा यात समावेश आहे. आपण जर मराठी सिनेमाचा विचार केला तर, याचे कारण म्हणजे प्रत्येक मल्टीप्लेक्समध्ये एक मराठी सिनेमा प्रदर्शित झालाच पाहिजे हा महाराष्टÑ शासनाने घालून दिलेला दंडक. प्रादेशिक चित्रपटांसाठी शासन सुमारे ३० ते ४० लाख रुपये देते. वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळी रक्कम असली तरी, यामुळे छोट्या बजेटचे चित्रपट निर्माण करणे सोपे झाले आहे.
कारण कोणतेही असो, प्रादेशिक चित्रपटांसाठी हा सुवर्णकाळ आहे, असे म्हणता येईल. तमिळ आणि मल्याळम चित्रपट उद्योगाने सर्व प्रादेशिक अडथळे दूर सारत नवे विक्रम केले. ‘कबाली’ आणि ‘बाहुबली’ यांचे यासाठी उदाहरण देता येईल. गत काही वर्षात बंगाल, महाराष्टÑ आणि पंजाब यांनी प्रादेशिक चित्रपट निर्मितीत खूप प्रगती केली आहे. यापूर्वी बॉलीवूडला सर्व स्तरावरुन सन्मान आणि आदर मिळायचा. सध्याची स्थिती पाहिली तर लोकांची ‘टेस्ट’ बदललेली आहे, असे आपल्या लक्षात येईल. त्यांना स्थानिक सांस्कृतिक वारसा पाहायला आवडतो. वास्तविकता हा सध्या सिनेक्षेत्रातील नवा परवलीचा शब्द बनला आहे.
प्रादेशिक चित्रपटांनी देखील विविध प्रयोग केले आहेत. आत्मकथा, सामाजिक नाटके, इतकेच नव्हे तर मसाला चित्रपटही आले आहेत. बॉलीवूडपेक्षा अधिक चांगले सादरीकरण त्यांनी केलंय. मुख्य प्रवाहातील दर्शकांना आपल्याकडे वळविण्यात आणि विश्वास मिळविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. प्रायोगिक आणि व्यावसायिक चित्रपटांदरम्यान दोन भाग करण्यात त्यांना यश आले आहे.
सध्याचे कलात्मक, तरुण चित्रपटनिर्माते त्यांच्या स्वत:च्या भाषेत कथा सांगत आहेत. सध्याची ही कलात्मक पिढी व्यावसायिक यशापयश याचा फारसा विचार करीत नाही. स्वत: तयार केलेल्या पठडीतील चित्रपट निर्माण करण्याची त्यांची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आपण जेव्हा बॉक्स आॅफिसचे आकडे आणि कलात्मकता यांचा विचार करतो, त्यावेळी प्रादेशिक चित्रपट नेहमीच वरचढ ठरतो.
मराठी चित्रपट उद्योग सशक्त कथानक आणि संगीताच्या बाबतीत अत्यंत दर्जेदार आणि उत्कृष्ट असल्याचे उदाहरण आहे. मराठी चित्रपट हा कथा सांगणारा उद्योग आहे. या ठिकाणचे बरेचसे कलाकार हे अनुशासनाप्रिय आहेत. हे चित्रपट कमी बजेटचे असतात आणि स्टार्सवर फारसे अवलंबून नसतात. त्यांची कथा साधी असते आणि शुटींग हे वास्तविक ठिकाणचे असते. बॉलीवूडप्रमाणे महागड्या सेटवर ते शूटींग करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटाने बॉक्स आॅफिस कलेक्शनचे सर्व रेकॉर्ड मोडले. पहिल्या आठ आठवड्यात या चित्रपटाने १०० कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय केला. कोणत्याही प्रादेशिक चित्रपटासाठी हा सर्वात मोठा इव्हेंट होता.
वैयक्तिरित्या मला असे वाटते, मराठी सिनेमांचे हे यश मुंबई ही महानगर असल्याचे दर्शविते. ज्यात विविध संस्कृती वसल्या आहेत. मुंबईत वाढणारे प्रत्येक जण मराठी सिनेमाशी जोडले गेले आहेत, जरी त्यांना मराठी बोलता येत नसले तरी. यामागचे आणखी एक कारण म्हणजे ते या मातीत वाढले आहेत. ते एकाचवेळा आपल्या सभोवताली काय घडतंय, हे पाहतात. यामुळे मराठीला आता बहुभाषिकदर्शकही मिळतो आहे.
आणखी विचार केला तर पंजाबी चित्रपट उद्योग हा देखील अशाच वाढीतून जातो आहे. बॉलीवूडचे मोठे कलाकार पंजाबी प्रादेशिक चित्रपटात काम करत आहेत. यामध्ये प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा आणि महेश भट्ट यांचे पंजाबी चित्रपटाबाबत नाव घेता येईल. या नामांकित प्रॉडक्शन हाऊसेसने पंजाबच्या वाढत्या आंतरराष्टÑीय बाजारपेठेत पाऊल ठेवले आहे. या चित्रपटांना आंतरराष्टÑीय स्थान आहे. समुद्रापार त्यांचे नाव आहे. उदाहरणार्थ ‘लव्ह पंजाब’ या चित्रपटाने अक्षय कुमारच्या ‘एअर लिफ्ट’पेक्षा  आणि संजय लीला भन्साली यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ पेक्षा आंतरराष्टÑीय पातळीवर मोठी कमाई केली. याचा परिणाम म्हणून अत्यंत नावाजलेले प्रॉडक्शन हाऊसेस आता हे यश मिळविण्यासाठी पुढे येत आहेत. निर्मात्यांनी आपली दिशा बदलली असून, ते या प्रादेशिक ठिकाणी येण्यास उत्सुक आहेत. २०१२-१३ साली २२ पंजाबी चित्रपट निर्माण झाले होते. २०१५-१६ साली ४५ चित्रपटांची निर्मिती झाली. (स्त्रोत: सीबीएफसी वार्षिक अहवाल)
बॉलीवूडच्या तुलनेत प्रादेशिक चित्रपट कमी किमतीत चांगली कामगिरी करीत आहेत. प्रादेशिक चित्रपटात सुरुवातीची रक्कम वसूल करणे सोपे आहे. सध्या चित्रपटनिर्माते हे सांस्कृतिक पर्यावरण आणि दर्शकांच्या आकांक्षेशी जोडले जात आहेत. कथा सांगण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे प्रादेशिक चित्रपटांना आंतरराष्टÑीय चित्रपट महोत्सवात चांगली संधी मिळत आहे. या सर्व बाबींना एकत्र केल्या तर उत्कृष्ट कथानक आणि गुणवत्ता यामुळे प्रादेशिक चित्रपटांना निर्मात्यांच्या कोषात स्थान मिळाले आहे.

-नंदिनी मानसिंगका
संस्थापिका, डिजीबुस्टर कंपनी
 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :