गायक पापोन किस प्रकरणी बॉलिवूडमध्ये संताप; रविना टंडनने म्हटले, ‘त्वरित अटक करा’!

अभिनेत्री रविना टंडन हिने गायक पापोनला त्वरित अटक केली जावी, अशाप्रकारचे ट्विट केले आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधूनही पापोनला विरोध होताना दिसत आहे.

गायक पापोन किस प्रकरणी बॉलिवूडमध्ये संताप; रविना टंडनने म्हटले, ‘त्वरित अटक करा’!
Published: 24 Feb 2018 03:03 PM  Updated: 24 Feb 2018 03:03 PM

गायक पापोनच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत. कारण पापोनने केलेल्या कृत्याला आता बॉलिवूडमधूनही विरोध होत आहे. यामध्ये अभिनेत्री रविना टंडन हिचे नाव जोडले गेले असून, तिने स्पष्ट शब्दात पापोनला त्वरित अटक केली जावी, अशी भूमिका मांडली आहे. मायनर कंटेस्टेंटला किस करण्याच्या आरोपात अडकलेल्या पापोनला सातत्याने विरोध होताना दिसत आहे. महाराष्टÑाच्या महिला आणि बालविकास मंत्रालयानेदेखील याप्रकरणी आता ठोस पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. तर रविनाने पापोनला विरोध करण्यासाठी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त  केल्या आहेत. 

रविनाने तिच्या ट्विटमधून स्पष्ट केले की, गायक पापोनला त्वरित अटक केली जावी. तिने लिहिले की, ‘हे खूपच लज्जास्पद आणि घृणास्पद आहे. त्यामुळे पापोनला लवकरात लवकर अटक करायला हवी. यावेळी रविनाने हेदेखील म्हटले की, कंटेस्टेंटच्या आई-वडिलांवर पापोनला वाचविण्यासाठी दबाव टाकला जात आहे. 
 


यावेळी रविनाने असेही म्हटले की, ‘काही टीव्ही डिबेटमध्ये याप्रकरणी गायक पापोनचा बचाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब खूपच लाजिरवाणी आहे. दरम्यान, गायक शाननेदेखील याप्रकरणी पापोनच्या बाजूने एक ट्विट केले होते. मात्र शानने लगेचच हे ट्विट डिलीट केले. २३ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता पापोनने एक ट्विट करून त्याची बाजू मांडली होती. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :