रणबीर कपूर राहणार भोपाळ जेलमध्ये?

तुम्ही वाचताय ते खरे आहे! आश्चर्य वाटले ना तुम्हाला, परंतु कोणत्या कारणासाठी? रणबीर कपूर सध्या संजय दत्तच्या बायोपिकमध्ये काम करतो आहे. येरवडा जेलमध्ये संजय दत्त असताना त्याने कसे आयुष्य काढले ही माहिती घेण्यासाठी तो सहा दिवस भोपाळ जेलमध्ये राहण्याची शक्यता आहे.

रणबीर कपूर राहणार भोपाळ जेलमध्ये?
Published: 09 Mar 2017 05:58 PM  Updated: 09 Mar 2017 05:58 PM

तुम्ही वाचताय ते खरे आहे! आश्चर्य वाटले ना तुम्हाला, परंतु कोणत्या कारणासाठी? रणबीर कपूर सध्या संजय दत्तच्या बायोपिकमध्ये काम करतो आहे. येरवडा जेलमध्ये संजय दत्त असताना त्याने कसे आयुष्य काढले ही माहिती घेण्यासाठी तो सहा दिवस भोपाळ जेलमध्ये राहण्याची शक्यता आहे.
१९९३ च्या मुंबई बॉम्ब ब्लास्ट केस प्रकरणात संजय दत्त याला पाच वर्षाची शिक्षा झाली होती. गतवर्षीच संजय दत्तने आपली शिक्षा पूर्ण केली आणि आता तो नव्या चित्रपटाची शूटिंग करतो आहे. 



या चित्रपटात सुनील दत्त यांची भूमिका परेश रावल तर नर्गिस यांची भूमिका मनीषा कोईराला ही करीत आहे. अनुष्का शर्मा एका पत्रकाराची भूमिका करते आहे. सोनम कपूर ही संजय दत्तच्या प्रेमिकेची भूमिका साकारत आहे. रॉकी चित्रपटानंतर संजय दत्त कशा पद्धतीने पुढे आला, हे चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. त्याशिवाय संजय दत्तला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी झालेल्या शिक्षेसंदर्भातही माहिती देण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात रणबीर कपूर भोपाळमध्ये आला असता त्याच्या फॅन्सनी काढलेला फोटो शेअर केला आहे. चित्रपटाच्या सेटवरील हा फोटो व्हायरल झाला होता. 

बाहुबली 2 पाहाण्यास उत्सुक आहात का ?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :