​करण जोहरच्या सर्वाधिक महागड्या प्रोजेक्टमध्ये असणार रणबीर कपूर !

‘बाहुबली’ सीरिजनंतर बॉलिवूडलाही नवे स्फुरण चढले आहे. होय, आपणही ‘बाहुबली’सारखे मोठे प्रोजेक्ट बनवू शकतो, ही हिंमत बॉलिवूडने कमावलीय. विश्वास बसत नसेल तर करण जोहरचा खुलासा तुम्ही वाचायलाच हवा.

​करण जोहरच्या सर्वाधिक महागड्या प्रोजेक्टमध्ये असणार रणबीर कपूर !
Published: 17 Aug 2017 04:05 PM  Updated: 17 Aug 2017 04:05 PM

‘बाहुबली’ सीरिजनंतर बॉलिवूडलाही नवे स्फुरण चढले आहे. होय, आपणही ‘बाहुबली’सारखे मोठे प्रोजेक्ट बनवू शकतो, ही हिंमत बॉलिवूडने कमावलीय. विश्वास बसत नसेल तर करण जोहरचा खुलासा तुम्ही वाचायलाच हवा. होय, अलीकडे एका इव्हेंटमध्ये करणने आपल्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक मोठ्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती. रणबीर कपूरसोबत मिळून धर्मा प्रॉडक्शन आत्तापर्यंतचा सर्वात महागडा प्रोजेक्ट घेऊन येणार असल्याचे त्याने सांगितले होते. या प्रोजेक्टमध्ये तीन चित्रपटांचे प्लानिंग करण्यात आले आहे. हे चित्रपट एका पाठोपाठ एक येतील. आता हा प्रोजेक्ट काय, तर तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दिग्दर्शक अयान मुखर्जी रणबीर कपूरला घेऊन एक सुपरहिरो चित्रपट घेऊन येणार असल्याचे तुम्ही वाचले असेलच. या चित्रपटाचे नाव आहे ‘ड्रगन’(तात्पुरते नाव). या चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन दिसणार आहेत. करण जोहरने दिलेल्या माहितीनुसार, याच चित्रपटाअंतर्गत ट्रायलॉजी रिलीज केली जाणार आहे. याचा अर्थात ‘ड्रगन’ सीरिजचे तीन पार्ट आपल्याला एकापाठोपाठ एक असे बघायला मिळणार आहेत.
याबद्दल करणने सांगितले की, रणबीर कायम धर्मा प्रॉडक्शनचा भाग राहिला आहे. आत्तापर्यंत आमच्या प्रॉडक्शनने त्याच्यासोबत जे चित्रपट केलेत, ते सगळे हिट ठरलेत. त्यामुळे आम्ही पुन्हा रणबीरसोबत काम करण्यास उत्सूक आहोत. ‘ड्रगन’सीरिज अयान मुखर्जी डायरेक्ट करेल. हा चित्रपट एक वेगळ्या प्रकारचा सिनेमॅटीक एक्सपिरिअन्स असेल. याच्या स्क्रिप्टिंगला बराच वेळ लागणार. कारण आम्ही याची ट्रायलॉजी घेऊन येतो आहोत. हा धर्मा प्रॉडक्शनचा सर्वात मोठा प्रोजेक्ट असेल. आक्टोबर वा नोव्हेंबरमध्ये याचे शूटींग सुरु होईल. येत्या सप्टेंबरमध्ये याचे शीर्षक जाहिर केले जाईल.
आत्तापर्यंत अनेक चित्रपटांचे सीक्वल आले आहेत. मात्र हे चित्रपट बनवताना मेकर्सने ट्रायलॉजी प्लान केली नव्हती. चित्रपट हिट झाला आणि मग मेकर्सनी त्याचे सीक्वल आणलेत. त्यामुळे करण, रणबीर व अयानचा हा प्रोजेक्ट एकूणच नवीन आहे. आता त्याचे रिझल्ट काय असतील, ते येत्या काळात आपल्याला दिसतीलच.


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :