​रणबीर कपूरसाठी नीतू सिंह यांनी पसंत केली लंडनची मुलगी!!

रणबीर कपूरला प्रेमात अपयश आले. पण लग्नाचे वय तर झालेय. मग थोडा सीरिअस विचार करायलाच हवा. कदाचित रणबीर या विषयावर जरा सीरिअस आहे. होय, चर्चा तशीच आहे. रणबीर कपूरची आई नीतू सिंह हिने आपल्या हॅण्डसम मुलासाठी लंडनची मुलगी पसंत केली आहे.

​रणबीर कपूरसाठी नीतू सिंह यांनी पसंत केली लंडनची मुलगी!!
Published: 11 May 2017 10:18 AM  Updated: 11 May 2017 10:18 AM

रणबीर कपूरचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. सर्वात आधी सोनम कपूर, मग दीपिका पादुकोण आणि नंतर कॅटरिना कैफ. यापैकी दीपिका आणि कॅटरिनासोबत रणबीरचे रिलेशनशिप बराच काळ चालले. पण या नात्याचा शेवट ब्रेकअपने झाला. एकंदर काय तर रणबीरला प्रेमात अपयश आले. पण लग्नाचे वय तर झालेय. मग थोडा सीरिअस विचार करायलाच हवा. कदाचित रणबीर या विषयावर जरा सीरिअस आहे. होय, चर्चा तशीच आहे. रणबीर कपूरची आई नीतू सिंह हिने आपल्या हॅण्डसम मुलासाठी लंडनची मुलगी पसंत केली आहे. रणबीर कपूर अलीकडे नीतू सिंहसोबत लंडनमध्ये हॉली डे वर गेला होता. कामातून बे्रक घेण्यासाठी रणबीरने या सुट्ट्या प्लान केल्याचे मानले गेले होते. पण असे नव्हतेच मुळी. रणबीर व नीतू दोघेही एका खास कारणाने लंडनला गेले होते. हे कारण म्हणजे रणबीरचे लग्न. आईने पसंत केलेल्या लंडनच्या एका मुलीला भेटायला रणबीर गेला होता. येथील एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगी नीतू यांनी रणबीरसाठी पसंत केली आहे.

ALSO READ : रणबीर कपूरचा हा नवा संजूबाबा लूक तुम्ही बघितला काय?

अर्थात अद्याप काहीही ठरलेले नाही. वेळ येईल तसे आपल्याला सगळे कळेलच. एकंदर काय तर, आईने पसंत केलेल्या मुलीशी लग्न करण्यासाठी रणबीर बºयाचअंशी राजी झालाय.
रणबीरच्या वधू संशोधनाची बातमी ऐकून देशातील कोट्यवधी मुलींचे हृदय तुटेल, हे आम्हाला ठाऊक आहे. पण बातमी हीच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जग्गा जासूस’चे शूटींग संपताच रणबीर लंडनला गेला होता. या चित्रपटात रणबीर त्याची एक्स गर्लफ्रेन्ड कॅटरिना कैफ हिच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. याशिवाय संजय दत्तच्या बायोपिकमध्ये  रणबीर सध्या बिझी आहे.

हाफ गर्लफ्रेंड हिंदी मीडियमवर भारी पडेल असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :