आॅस्करसाठी निवडलेल्या ‘न्यूटन’च्या शूटिंगदरम्यान झाले होते राजकुमार रावच्या आईचे निधन!

आईचे निधन झाल्याचे समजल्यानंतर राजकुमार लगेचच रायपूरला रवाना झाला होता, मात्र तो दुसºयाच दिवशी सेटवर हजर झाला. वाचा सविस्तर!

आॅस्करसाठी निवडलेल्या ‘न्यूटन’च्या शूटिंगदरम्यान झाले होते राजकुमार रावच्या आईचे निधन!
Published: 23 Sep 2017 04:38 PM  Updated: 23 Sep 2017 04:38 PM

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याचे त्याच्या कामाप्रती किती समर्पन असू शकते, याचा अंदाज बांधणेही मुश्किल म्हणावे लागेल. होय, राजकुमार रावच्या ज्या चित्रपटाची आज सर्वत्र चर्चा घडत आहे, त्या ‘न्यूटन’च्या शूटिंगदरम्यान राजकुमारवर असा काही प्रसंग ओढावला होता की, त्याला त्यातून सावरणे खूप अवघड होते. होय, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजकुमार रावच्या आईचे निधन झाले होते. त्यावेळी राजकुमार छत्तीसगढमधील जंगलात चित्रपटाचे शूटिंग करीत होता. त्याठिकाणी नेटवर्क खूपच कमी असल्याने, राजकुमारला ही दु:खद बातमी खूप उशिराने सांगण्यात आली. जेव्हा त्याला आईच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा तो लगेचच रायपूरला रवाना झाला. शूटिंग सेटवर उपस्थित असलेला प्रत्येकजण असेच समजून होता की, राजकुमारला परत येण्यासाठी किमान आठवडा लागू शकतो. कारण राजकुमार त्याच्या आईच्या खूपच क्लोज होता. 

मात्र सेटवरील क्रू आणि दिग्दर्शकांचा हा समज पूर्णत: फोल ठरला. कारण राजकुमार दुसºयाच दिवशी सेटवर हजर झाला. राजकुमारला सेटवर बघून सर्वच चकीत झाले. वास्तविक राजकुमारला अशी बातमी मिळाली होती की, सेटवरील सर्व क्रू छत्तीसगढच्या जंगलात त्याच्या अनुपस्थितीत खूप अडचणींचा सामना करीत आहे. हे ऐकून राजकुमार अस्वस्थ झाला होता. त्याने आईचे विधिवत अंतिम संस्कार करून पुन्हा तो शूटिंग लोकेशनस्थळी पोहोचला. राजकुमारने एका चॅनलशी बोलताना म्हटले होते की, ‘मला माहीत आहे माझ्या आईला हे ऐकून आनंद होईल की, मी माझे कमिटमेंट पूर्ण केले. पुढे बोलताना राजकुमारने म्हटले की, ‘मला स्क्रीनवर बघून माझ्या आईला सर्वात जास्त आनंद होत असे. कामाप्रती राजकुमारचे डेडिकशन बसून निर्मात्यांनीदेखील ‘न्यूटन’च्या सुरुवातीलाच राजकुमारच्या आईचा फोटो दाखवित त्यांना स्पेशल क्रेडिट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. 

असो, न्यूटनला भारताकडून आॅस्करकरिता पाठविण्यात आले असून, या चित्रपटाकडून संबंध भारतीयांना अपेक्षा लागून आहेत. चित्रपटाची कथा छत्तीसगढ येथील एक जंगलात घेऊन जाते. तेथील लोकांनी कधीही वोटिंग मशीन बघितलेली नसते. त्यामुळे त्यांना सांगितले जाते की, वोटिंग मशीन एक खेळणे असून, तुम्हाला जे आवडेल ते बटन मी दाबायला हवे. ज्यास न्यूटन (राजकुमार राव) विरोध करतो. त्याचा प्रयत्न असतो की, लोकांना निवडणुकीचा अर्थ समजावा, त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी. 


राणी मुखर्जीचा हिचकी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :