BOX OFFICE : आलिया भट्टच्या ‘राजी’ची शंभर कोटींच्या दिशेने वाटचाल; आतापर्यंत कमाविले इतके कोटी!!

आलिया भट्टच्या ‘राजी’ या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही कमाईचा जोर कायम ठेवला आहे. केवळ नऊच दिवसांमध्ये चित्रपटाने शंभर कोटींच्या आसपास कमाई केली आहे.

BOX OFFICE : आलिया भट्टच्या ‘राजी’ची शंभर कोटींच्या दिशेने वाटचाल; आतापर्यंत कमाविले इतके कोटी!!
Published: 20 May 2018 06:17 PM  Updated: 20 May 2018 07:43 PM

अभिनेत्री आलिया भट्टचा ‘राजी’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. परंतु अशातही चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढच होताना दिसत आहे. वास्तविक गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘डेडपूल-२’ या हॉलिवूड चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर मजबूत पकड निर्माण केली आहे. मात्र अशातही आलियाचा ‘राजी’ चांगली कामगिरी करताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या दुसºया शुक्रवारी ‘राजी’ने ४.७५ कोटी रूपयांचा बिझनेस केला, तर शनिवारी त्यात वाढ होताना दिसली. आतापर्यंत चित्रपटाने ५८.७४ कोटी रूपयांचा व्यवसाय केला असून, त्यात शनिवारी ७.५४ कोटी रूपयांची भर पडली. 

ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, ‘राजीने पहिल्याच आठवड्यात ५६.५९ कोटी रूपयांचा व्यवसाय केला होता. दुसºया आठवड्यात (शुक्रवार आणि शनिवार) त्यात १२.२९ कोटी रूपयांची भर पडली. त्यामुळे नऊ दिवसांतच चित्रपटाने आतापर्यंत ६८.८८ कोटी रूपयांचे कलेक्शन केले आहे. केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही चित्रपट चांगली कामगिरी करताना बघावयास मिळत आहे. तरण आदर्शच्या मते, चित्रपटाने १८ मेपर्यंत विदेशी मार्केटमध्ये २१.३६ कोटी रूपयांचे कलेक्शन केले आहे. भारत आणि विदेश असे दोन्ही मिळून चित्रपटाने आतापर्यंत ९० कोटी रूपयांचा गल्ला जमविला आहे. 

दरम्यान, आलियाचा ‘राजी’ एक स्पाय ड्रामा आहे. ज्यामध्ये आलिया एका अशा मुलीची भूमिका साकारत आहे, जी पाकिस्तानात राहून भारतासाठी हेरगिरी करीत असते. मेघना गुलजार यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘राजी’मध्ये आलिया व्यतिरिक्त विकी कौशल, रजत कपूर आणि जयदीप अहलावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मेघना गुलजारच्या या अगोदरच्या ‘तलवार’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगले प्रदर्शन केले होते. आता ‘राजी’देखील चांगले कलेक्शन करताना दिसत आहे. 

shows SOLID GROWTH on second Sat [58.74%]... This, despite facing stiff competition from the Hollywood biggie ... Expect biz to jump on second Sun... Eyeing ₹


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :