​‘राबता’चा ट्रेलर आला... पाहा, सुशांत सिंह राजपूत व क्रिती सॅननची आॅनस्क्रीन केमिस्ट्री!

सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सॅनन या कथित लव्हबर्ड्सची ‘राबता’मधील आॅनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यास तुम्ही उत्सूक आहात, हे आम्ही जाणतो. तुमची ही उत्सुकता आम्ही काही प्रमाणात शमवणार आहोत. होय,काही मिनिटांपूर्वी ‘राबता’चा ट्रेलर लॉन्च झाला.

​‘राबता’चा ट्रेलर आला... पाहा, सुशांत सिंह राजपूत व क्रिती सॅननची आॅनस्क्रीन केमिस्ट्री!
Published: 17 Apr 2017 02:08 PM  Updated: 17 Apr 2017 02:08 PM

सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सॅनन या कथित लव्हबर्ड्सची ‘राबता’मधील आॅनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यास तुम्ही उत्सूक आहात, हे आम्ही जाणतो. तुमची ही उत्सुकता आम्ही काही प्रमाणात शमवणार आहोत. होय,काही मिनिटांपूर्वी ‘राबता’चा ट्रेलर लॉन्च झाला. हा ट्रेलर बघता, ‘राबता’ दोन जन्मांची कथा असावी, असे वाटते. एक कथा आजच्या काळातील आहे तर एक कथा अनेक दशकांपूर्वीची. इंटरेस्टिंग भाग म्हणजे, या दोन्ही कथेतील लोक परस्परांशी जुळलेले आहेत. या ट्रेलरमध्ये  इरफान खान नरेशन देताना दिसतोय. इरफानच्या आवाजामुळे ट्रेलर अधिकच रोमांचक बनले आहे. दिनेश दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर बघून तुम्हाला अलीकडे आलेल्या ‘मिर्झ्या’ या चित्रपटाची आठवण होऊ शकते. (अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर याने ‘मिर्झ्या’द्वारे बॉलिवूड डेब्यू केले होते. ) पण ‘राबता’च्या ट्रेलरमधील आजच्या काळातील कथा पाहणे अधिक रोचक वाटते. यात क्रिती व सुशांतची केमिस्ट्री अफलातून दिसते. ‘नीरजा’ सारख्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त चित्रपटात आपल्या अभिनयाची चमक दाखवणारा जिम सर्भ हा सुद्धा या चित्रपटात आहे. त्याची भूमिकाही दमदार दिसतेय.


ALSO READ : क्रिती सॅननची एकच इच्छा; सुशांतला मिळावा बेस्ट अ‍ॅक्टरचा आयफा अवार्ड!

या चित्रपटाच्या निमित्ताने सुशांत व क्रिती पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.  याच चित्रपटाच्या सेटवर सुशांत आणि क्रितीचे प्रेम फुलल्याचे मानले जाते. ‘राबता’च्या सेटवर सुशांत क्रितीमध्ये असा काही गुंतला की, त्यानंतर अंकिता लोखंडेसोबतच्या त्याच्या ब्रेकअपचीच बातमी आली. तूर्तास सुशांत व क्रिती रिलेशनशिपमध्ये आहेत. अर्थात दोघेही हे मानायला तयार नाही. पण दोघांमध्ये बरेच काही शिजतेय, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. त्यामुळे या दोघांची जबरदस्त आॅनस्क्रीन केमिस्ट्री पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :