​‘जब मलाला मेट प्रियांका चोप्रा....!’ पीसीने लिहिली लांबलचक पोस्ट!!

नुकताच मलालाने एक फोटो शेअर केला. तोही प्रियांका चोप्रासोबतचा. प्रियांकाला भेटून मलाला हरकून गेली.

​‘जब मलाला मेट प्रियांका चोप्रा....!’ पीसीने लिहिली लांबलचक पोस्ट!!
Published: 21 Sep 2017 01:52 PM  Updated: 21 Sep 2017 01:52 PM

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजईने केवळ दोन महिन्यांपूर्वी Twitter जॉईन केले होते. तेव्हापासून आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक अपडेट्स ती सोशल मीडियावर शेअर करतेय. नुकताच मलालाने एक फोटो शेअर केला. तोही प्रियांका चोप्रासोबतचा. प्रियांकाला भेटून मलाला हरकून गेली.
युनिसेफची गुडविल अ‍ॅम्बिसीडर प्रियांका चोप्रा संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील ‘ग्लोबल गोल्स अवार्ड्स’मध्ये पोहोचली. यादरम्यान मलाला उपस्थित होती. मग काय, मलाला आणि प्रियांका एकत्र म्हटल्यावर एक ‘क्लिक’ तर बनतोच. दोघींनीही एकत्र पोझ दिली आणि केवळ एकत्र पोझ दिली नाही तर हा ‘फॅन मोवमेंट’ मलालाने Twitterवर शेअर केला. ‘मला विश्वास बसत नाहीयं की, मी प्रियांका चोप्राला भेटले,’ असे tweet तिने केले.


प्रियांकानेही मलालाच्या या tweetला तेवढेच प्रेमळ शब्दांत उत्तर दिले. ‘ओह मलाला, तुझ्या भावनांना उत्तर द्यायला मला शब्द अपुरे पडतील. मला विश्वास बसत नाहीयं की, मी तुला भेटले. तू एक मोठ्या मनाची लहानशी मुलगी आहेस. तुझी प्रचंड मोठी उपलब्धी... मला अभिमान आहे,’असे प्रियांकाने लिहिले.


ALSO READ : एमी अवार्ड्समध्ये निवेदिकेने केली चूक अन् नाराज झाले प्रियांका चोप्राचे चाहते!

प्रियांका केवळ इथेच थांबली नाही तर, तिने मलालासाठी एक लांबलचक पोस्ट लिहिली. ‘या मुलीवर मी अख्खी कादंबरी लिहू शकते. ती खरोखरीच मार्मिक, प्रेरणादायी तेवढीच खुसखुशीत स्वभावाची आहे. पण मी कमी शब्दांत तिच्याबद्दल सांगू इच्छिते. मलाला, तू एक शक्ति आहे आणि संपूर्ण जग तुझी शक्ती ओळखून आहे. या जगाला सुंदर बनवू इच्छिणाºया प्रत्येक व्यक्तीसाठी तू एक आदर्श आहेस. तुझे आणि तुझेच वडील मिस्टर यूसुफजई (जे मला माझ्या वडिलांची आठवण करून देतात) यांच्यासोबत काही तास घालवल्यानंतर मला कळले की, तू नव स्वप्नांची कास धरलेली एक तरूणी आहेस. तू मला ऐकवलेले जोक्स, हिंदी चित्रपटांबद्दलचे तुझे प्रेम आणि तुझ्या ओठांवरचे हास्य पाहून जाणवते की, तुझ्या नाजूक खांद्यावर किती मोठी जबाबदारी आहे. तुझ्यासोबत आपल्या सीक्रेट हिंदी/उर्दूच्या सीक्रेट भाषेत पुन्हा गप्पा मारण्यासाठी मी आतूर आहे,’ असे प्रियांकाने लिहिलेय.


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :