हरियाणामधील ​प्रद्युमनच्या हत्येवर प्रसून जोशीने लिहिलेली कविता वाचून तुम्हीदेखील व्हाल भावुक

हरियाणातील ​प्रद्युमनच्या हत्येवर प्रसून जोशीनी एक कविता लिहिली असून ही कविता प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहे.

हरियाणामधील ​प्रद्युमनच्या हत्येवर प्रसून जोशीने लिहिलेली कविता वाचून तुम्हीदेखील व्हाल भावुक
Published: 13 Sep 2017 10:24 AM  Updated: 13 Sep 2017 10:29 AM

हरियाणामधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या प्रद्युमनच्या हत्येनंतर संपूर्ण देश सुन्न झाला आहे. सात वर्षांच्या प्रद्युमनची हत्या त्याच्याच शाळेच्या बाथरूममध्ये गळा आवळून करण्यात आली. प्रद्युमनच्या हत्येचे पडसाद हरियाणामध्ये चांगलेच उमटले. या शाळेतील पालकांनी तिथे जाळपोळ देखील केली होती. प्रद्युमन दुसरीत शिकणारा अतिशय गोंडस मुलगा होता. शाळेच्या बसच्या कंडक्टरनेच त्याची गळा दाबून हत्या केली. तो कंडक्टर प्रद्युमनचै लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यावर प्रद्युमनने विरोध केल्याने त्या कंडक्टरने त्या इवलाशा जीवाला मारून टाकले. प्रद्युमनच्या झालेल्या या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीदेखील या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
सेन्सर बॉर्डाचे अध्यक्ष आणि गीतकार प्रसून जोशी यांनी या घटनेवर एक कविता लिहिली आहे. ही कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून लोकांचे हृदय हेलावून टाकत आहे. या कवितेला दीड हजारहून अधिक लोकांनी शेअर केले आहे. या कविताच्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत...

जब बचपन तुम्हारी गोद में आने से कतराने लगे,
जब माँ की कोख से झाँकती ज़िन्दगी,
बाहर आने से घबराने लगे,
समझो कुछ ग़लत है ।
जब तलवारें फूलों पर ज़ोर आज़माने लगें,
जब मासूम आँखों में ख़ौफ़ नज़र आने लगे,
समझो कुछ ग़लत है 
जब ओस की बूँदों को हथेलियों पे नहीं,
हथियारों की नोंक पर थमना हो,
जब नन्हें-नन्हें तलुवों को आग से गुज़रना हो,
समझो कुछ ग़लत है
जब किलकारियाँ सहम जायें
जब तोतली बोलियाँ ख़ामोश हो जाएँ
समझो कुछ ग़लत है
कुछ नहीं बहुत कुछ ग़लत है
क्योंकि ज़ोर से बारिश होनी चाहिये थी
पूरी दुनिया में
हर जगह टपकने चाहिये थे आँसू
रोना चाहिये था ऊपरवाले को
आसमान से 
फूट-फूट कर
शर्म से झुकनी चाहिये थीं इंसानी सभ्यता की गर्दनें
शोक नहीं सोच का वक़्त है
मातम नहीं सवालों का वक़्त है ।
अगर इसके बाद भी सर उठा कर खड़ा हो सकता है इंसान
तो समझो कुछ ग़लत है l


अभिनेता संजय दत्तने देखील या घटनेवर ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याने ट्वीट मध्ये म्हटले आहे की, हा अतिशय वाईट काळ असून प्रत्येक पित्याला असाहाय्य असल्यासारखे वाटू लागले आहे. मुलं आता शाळेत देखील सुरक्षित नाहीयेत. मुलांच्या बाबतीत पालकांनी आता अधिक सतर्कतेने राहाण्याची गरज आहे. 

Also Read : प्रसून जोशी म्हणतात, ज्या गाण्यांचा महिलांनी विरोध करायला हवा, त्याच गाण्यांवर त्या नाचत आहेत


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :