POSTER BOYS NEW POSTER OUT : ‘मर्द का दम, क्या होगा नसबंदी से कम?’

मराठीतील ‘पोस्टर बॉयज’च्या यशानंतर हिंदीमध्ये सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे स्टारर ‘पोस्टर बॉयज’ पुन्हा एकदा धूम उडवून देण्यास येत आहे.

POSTER BOYS NEW POSTER OUT :  ‘मर्द का दम, क्या होगा नसबंदी से कम?’
Published: 01 Sep 2017 01:13 PM  Updated: 01 Sep 2017 01:53 PM

मराठीतील ‘पोस्टर बॉयज’च्या यशानंतर हिंदीमध्ये सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे स्टारर ‘पोस्टर बॉयज’ पुन्हा एकदा धूम उडवून देण्यास येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे एक नवे पोस्टर रिलीज करण्यात आले असून, त्यामध्ये सनी, बॉबी आणि श्रेयसचा अंदाज बघण्यासारखा आहे. हा चित्रपट येत्या ८ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपट एक कॉमेडी ड्रामा असल्याने त्याचे आतापर्यंतचे सर्व पोस्टर्स त्याच स्टाइलमध्ये रिलीज केले जात आहेत. या नव्या पोस्टरमध्ये बॉबी देओल नाइट ड्रेसमध्ये स्कूटर चालविताना दिसत आहे, तर त्याच्यामागे सनी आणि श्रेयस बसलेले दिसत आहेत. सनी देओलच्या हातात एक मोठे पोस्टर दिसत असून, त्यावर तिघांचे फोटो आहेत. तसेच ‘बिना टाका नसबंदी आॅपरेशन’ असेही त्यावर लिहिले आहे, तर पोस्टरच्या वरच्या भागात मोठ्या शब्दांमध्ये ‘मर्द का दम, क्या होगा नसबंदी से कम?’ असे लिहिले आहे. 

चित्रपटाची कथा एका छोट्या गावात राहणाºया अशा तीन पुरुषांवर आधारित आहे ज्यांचे आयुष्य एका दिवसातच पूर्णत: बदलले जाते. एक दिवस अचानकच त्यांना माहिती होते की, आरोग्य विभागाने त्यांच्या गावात नसबंदीचे पोस्टर लावले असून, पोस्टर्सवर तिघांचेही फोटो झळकत आहेत. शिवाय ‘आम्ही नसबंदी केली तुम्ही केव्हा करणार’ असा संदेश हे तिघे देत असल्याचे पोस्टर्सच्या माध्यमातून देण्यात आला आहे. त्यामुळे या तिघांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ होते. अशात सनी, बॉबी आणि श्रेयस या प्रसंगाचा कसा सामना करतील हे चित्रपट बघितल्यानंतरच स्पष्ट होईल. आतापर्यंत चित्रपटाच्या पोस्टर्ससह ट्रेलर रिलीज करण्यात आले असून, त्यास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  वास्तविक ‘पोस्टर बॉयज’ या चित्रपटाची सुरुवातीला मराठीत निर्मिती करण्यात आली आहे. मराठी प्रेक्षकांनी त्यावेळेस चित्रपटाला चांगला प्रतिसादही दिला आहे. आता याच नावाने हिंदीमध्ये चित्रपट बनविला असल्याने प्रेक्षक त्यास कितपत प्रतिसाद देतील हे येत्या काळात स्पष्ट होईलच. दरम्यान, श्रेयस तळपदेने मराठी ‘पोस्टर बॉयज’चा निर्माता म्हणून काम बघितले होते. आता हिंदी रिमेकमध्ये तो अभिनयाबरोबरच दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे, तर सोनी पिक्चर्स नेटवर्क्स प्रॉडक्शन, सनी साउंड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एफ्फलूएंस मुव्हीज प्रायव्हेट लिमिटेड या चित्रपटाला प्रोड्युस करीत आहेत. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :