​दीपिका पादुकोण थकलीयं फार! पण का?

‘पद्मावती’साठी भन्साळींसह सर्व कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली. दीपिकाला विचाराल तर ‘पद्मावती’ हा तिच्यासाठी एक थकवणारा अनुभव होता

​दीपिका पादुकोण थकलीयं फार! पण का?
Published: 17 Oct 2017 03:54 PM  Updated: 17 Oct 2017 03:54 PM

दीपिका पादुकोण लवकरच संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये झळकणार आहे. राणी पद्मावतीच्या भूमिकेतील दीपिकाचा फर्स्ट लूक आपण पाहिलात.लाल रंगाचा लेहंगा आणि त्यावर भरजरी दागिने अशा शाही अंदाजात राणी पद्मावतीच्या रूपातील दीपिका पादुकोणला पाहून तर सगळेच मोहित झाले. नुकताच संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘पद्मावती’चा ट्रेलरही रिलीज झाला. भव्यदिव्य असा सिनेमाचा ट्रेलरही रसिकांना चांगलाच भावला.  पहिल्या २४ तासांत पहिल्या २४ तासांत या चित्रपटाने १.५ कोटी व्ह्युज मिळवले. युट्यूबवर  ‘पद्मावती’चा ट्रेलर २ कोटींवर युजर्सनी पाहिला. यावरून हा चित्रपट पाहण्यास प्रेक्षक किती आतूर आहेत, याचा अंदाज येतो.  
 ‘पद्मावती’साठी भन्साळींसह सर्व कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतली. दीपिकाला विचाराल तर ‘पद्मावती’ हा तिच्यासाठी एक थकवणारा अनुभव होता. काल हेमा मालिनी यांच्या ‘बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या जीवनचरित्राचे प्रकाशन झाले. दीपिका यावेळी हजर होती. याप्रसंगी बोलताना ‘पद्मावती’बद्दलचा अनुभव दीपिकाने शेअर केला. भन्साळी हे माझ्यासाठी निश्चितपणे लकी आहेत. त्यांच्यासोबत ‘पद्मावती’ हा माझा तिसरा चित्रपट असणार आहे. भन्साळींसोबत तिसºयांदा काम करण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य समजते. पण खरे सांगायचे तर ‘पद्मावती’तील माझी भूमिका माझ्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपैकी सर्वाधिक यादगार भूमिका राहिली. पण ‘पद्मावती’मुळे मी खरचं खूप थकलेय. या सिनेमाने मला कधी नव्हे इतके थकवले. आम्ही सात आठ महिने न थांबता काम केले, असे तिने सांगितले. आता इतकी थकल्यानंतर दीपिकाला एक ब्रेक तर हवाच. ‘पद्मावती’च्या रिलीजनंतर दीपिका एक मोठ्ठा ब्रेक नक्की घेणार, हे यावरून समजून जावे.

ALSO READ: ‘पद्मावती’च्या कलाकारांनी घेतली तगडी फी! जाणून घ्या किती?

या सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने राणी पद्मावती ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. शाहिद कपूरने महाराजा रतन सिंह तर रणवीर सिंहने अल्लाउद्दीन खिलजी ही भूमिका साकारली आहे. सिनेमात सगळ्याच कलाकारांचा   पोशाख आकर्षक आणि तितकाच वजनदार आहे. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :