​श्रीरेड्डीच्या आरोपामुळे भडकला नानी, आता देणार कायद्याच्या भाषेत उत्तर !!

साऊथ इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाविरोधात टॉपेलस आंदोलन करणारी अभिनेत्री श्रीरेड्डी पुन्हा चर्चेत आली आहे.

​श्रीरेड्डीच्या आरोपामुळे  भडकला नानी, आता देणार कायद्याच्या भाषेत उत्तर !!
Published: 13 Jun 2018 01:52 PM  Updated: 13 Jun 2018 01:52 PM

साऊथ इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणाविरोधात टॉपेलस आंदोलन करणारी अभिनेत्री श्रीरेड्डी पुन्हा चर्चेत आली आहे. होय, श्रीरेड्डीने तेलगू इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यात एक नाव होते, तेलगू अभिनेता नानी याचे. श्री रेड्डींच्या आरोपांनी नानी चांगलाच भडकला होता आणि आता त्याने श्री रेड्डीविरोधात कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले आहे.
नानीने याबद्दल चुप्पी तोडली असून सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  श्रीरेड्डीने माझ्यााविरोधात फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. यात तिने माझ्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत. पण तिचे सगळे आरोप खोटे आहेत. आता मी सोशल मीडियावर श्रीरेड्डीच्या आरोपांना कुठलेही उत्तर देणार नाही. आता जे काही उत्तर देईल ते कायद्याच्या भाषेतचं देईल़. तिच्या आरोपांमुळे मी स्वत:साठी नाही तर तमाम इंडस्ट्रीसाठी चिंतीत आहे,असे नानीने म्हटले आहे.
  श्रीरेड्डीने नानीवर तेलगू बिग बॉसमध्ये जाण्यापासून रोखल्याचा आरोप केला होता.  तेलगू इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत असलेल्या श्री रेड्डीने तेलगू फिल्म चेंबरकडे  कास्टिंग काउचबाबत तक्रार केली होती. पण फिल्म चेंबरने तिच्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली नाही. अखेर श्री रेड्डीने फिल्म चेंबरबाहेरचं कॅमे-यासमोर टॉपलेस होण्याचा निर्णय घेत  कॅमे-यासमोर  कपडे उतरवले होते.  यावेळी तिने कास्टिंग काउचमध्ये अडकलेल्या अनेक बड्या नावांचा खुलासा करण्याची धमकी दिली होती. तेलगू फिल्म इंडस्ट्री माझ्यासारख्या अभिनेत्रींना संधी नाकारली जाते. मला तेलगू फिल्म चेंबर आॅफ कॉमर्सचे सदस्यत्व हवे आहे. पण चेंबर मला सदस्यत्व देण्यास तयार नाही.मी काम मागितले की, न्यूड फोटो आणि व्हिडिओची मागणी केली जाते. केवळ ही मागणी पूर्ण करत नसल्याने मला संधी नाकारली जात आहे, असा आरोप श्री रेड्डीने यावेळी केला होता. 

ALSO READ : अन् कास्टिंग काउचच्या विरोधात अभिनेत्रीने रस्त्यावर उतरवले कपडे; टॉपलेस होऊन केले आंदोलन!

 त्यापूर्वी श्री रेड्डीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एका दिग्गज तेलगू दिग्दर्शकावर आरोप केले होते. हा बडा दिग्दर्शक काही दिवसांपासून माझ्या घरासमोर घिरट्या घालत असल्याचे तिने म्हटले होते. शिवाय त्या दिग्दर्शकावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. तो मला व्हिडिओ कॉल करायला सांगतो, असेही ती म्हणाली होती.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :