Iconic ladies: ​श्रीदेवीच्या बर्थ डे पार्टीतील काही ‘युनिक’ फोटो पाहा इथे!

नुकताच श्रीदेवीने आपला ५३ वा वाढदिवस साजरा केला. १३ आॅगस्टला श्रीदेवीने कुटुंबीयांसोबत वाढदिवसाची पार्टी केली. पण ही पार्टी इथेच संपली नाही. गुरुवारी रात्री श्रीदेवीचा फॅमिली फ्रेन्ड मनीष मल्होत्राकडे आणखी एक पार्टी रंगली.

Iconic ladies:  ​श्रीदेवीच्या बर्थ डे पार्टीतील काही ‘युनिक’ फोटो  पाहा इथे!
Published: 18 Aug 2017 01:03 PM  Updated: 18 Aug 2017 01:03 PM

नुकताच श्रीदेवीने आपला ५३ वा वाढदिवस साजरा केला. १३ आॅगस्टला श्रीदेवीने कुटुंबीयांसोबत वाढदिवसाची पार्टी केली. पण ही पार्टी इथेच संपली नाही. गुरुवारी रात्री श्रीदेवीचा फॅमिली फ्रेन्ड मनीष मल्होत्राकडे आणखी एक पार्टी रंगली. बॉलिवूडचा लोकप्रीय डिझाईनर मनीष मल्होत्रा कायम आपल्या मित्रांची बर्थ डे पार्टी होस्ट करतो. मनीषने श्रीदेवीसाठीही पार्टी ठेवली.





या पार्टीत श्रीदेवी, बोनी कपूर , तिच्या दोन मुली खुशी व जान्हवी असे सगळे होतेच. पण त्याशिवाय सुपरस्टार रेखा, विद्या बालन, राणी मुखर्जी, ऐश्वर्या राय असे सगळे स्टारही या पार्टीत दिसले. करण जोहर हाही या पार्टीचे खास आकर्षण होता. करणने या पार्टीचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटोत करण व मनीष बॉलिवूडच्या अनेक लीडिंग लेडिजसोबत दिसतो आहे. या फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे, वेगवेगळ्या जनरेशनच्या अभिनेत्री एका फ्रेममध्ये या फोटोत दिसत आहेत. हा युनिक फोटो कुणीही एकदा बघावा, असाच आहे. श्रीदेवीनेही एक फोटो शेअर केलाय. यास रेखा एका मस्तीभºया पोझमध्ये दिसतेय.





श्रीदेवीच्या या बर्थ डे पार्टीत विद्या व एव्हरग्रीन रेखा नेहमीप्रमाणे आपल्या स्टाईलिश साडीत दिसली. तर ऐश्वर्या राय बच्चन लाँग गाऊनमध्ये. शबाना आझमी पती जावेद अख्तरसोबत पार्टीत आली.





ALSO READ : OMG : ​श्रीदेवीने मुलींसाठी बनविला ‘नो लेट नाईट रुल..!’

श्रीदेवीची मुलगी जान्हवी ही सुद्धा पार्टीचे आकर्षण ठरली. जान्हवी कपूर यावेळी अतिशय सेक्सी टॉपमध्ये यावेळी दिसली. एकंदर काय तर, पार्टी जबरदस्त रंगली. या पार्टीचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तेव्हा बघाच!!


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :