​tweets on Azaan : सोनू निगमला फेसबुक पाठींबा देणे, ‘त्या’ दोघांना पडले महाग!

पार्श्वगायक सोनू निगमने अजानसंदर्भातील ट्विटवरून निर्माण झालेला वाद मिटण्याऐवजी आणखी चिघळत चालल्याचे दिसतेय. सोशल मीडियावर सोनू निगमला पाठिंबा दिला म्हणून दोन युवकांना मुलांच्या एका गटाने चाकूने भोसकले.

​tweets on Azaan : सोनू निगमला फेसबुक पाठींबा देणे, ‘त्या’ दोघांना पडले महाग!
Published: 21 Apr 2017 10:07 AM  Updated: 21 Apr 2017 10:07 AM

पार्श्वगायक सोनू निगमने अजानसंदर्भातील ट्विटवरून निर्माण झालेला वाद मिटण्याऐवजी आणखी चिघळत चालल्याचे दिसतेय. केवळ सोशल मीडियावरच नाही तर वास्तवातही त्याचे पडसाद उमटू लागले आहे. मध्यप्रदेशात या वादाला हिंसक वळण मिळाले.  सोशल मीडियावर सोनू निगमला पाठिंबा दिला म्हणून दोन युवकांना  मुलांच्या एका गटाने चाकूने भोसकले. ही घटना उज्जैन येथील फ्रीगंज भागात घडली. जखमी मुलाचे नाव शिवम असून त्याच्या मित्रालाही आरोपींनी भोसकून जखमी केले आहे.

अलीकडे गायक सोनू निगमने अजानसंदर्भात टिष्ट्वट केले होते. ‘देव सर्वांचं भलं करो. मी मुस्लिम नसूनही सकाळी अजानच्या आवाजानेच मला जाग येते. भारतात बळजबरीने चालणा-या या धार्मिक रुढी कधी थांबणार?  असे तो म्हणाला होता. यावरून देशात मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी सोनूच्या या  ट्विटवर तीव्र संताप व्यक्त केला. अर्थात काहींनी सोनूला पाठींबाही दिला.  उज्जैनच्या शिवमनेही सोनूला पाठींबा जाहिर केला. फेसबुकवरील एका पोस्टमध्ये यापुढे आपण आता फक्त सोनू निगमचेच गाणे ऐकणार,असे त्याने म्हटले. त्यावरून फैजान खान नावाच्या एका मुलाने आपल्या काही मित्रांसह शिवमला त्याच्या या पोस्टबद्दल जाब विचारला आणि त्याला चाकूने भोसकले. या वेळी शिवमबरोबर त्याचा मित्रही होता. त्यालाही या टोळक्याने भोसकले. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

ALSO READ : सोनू निगमला टिवटिवाट भोवला; एफआयआर दाखल, फतवा जारी!

या संपूर्ण वादावर सोनूने पत्रपरिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. कोणालाही दुखावण्याचा, कोणत्याही धमार्ची निंदा करण्याचा माझा हेतू नाही. त्यासोबतच कोणाचाही अनादर करण्यासाठी मी ते ट्विट केले नव्हते. मुळात माझा विरोध आहे लाउडस्पीकरला, त्यामुळे होणाºया मोठ्या आवाजाला,असे सोनूने म्हटले होते. 
 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :