​लव्ह यू फॅमिली'चा ट्रेलर लाँच

डान्स इंडिया डान्स फेम सलमान युसुफ खान लव्ह यू फॅमिली या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईच लाँच करण्यात आला.

​लव्ह यू फॅमिली'चा ट्रेलर लाँच
Published: 19 May 2017 05:51 PM  Updated: 19 May 2017 05:51 PM

लव्ह यू फॅमिली'चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते भरत शहा यांच्या हस्ते लव्ह यू फॅमिली या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच करण्यात आले.
सचिन्द्र शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाचे म्युझिक झी म्युझिक कंपनी द्वारे रिलीज करण्यात आले आहे. विपुल देवानी आणि  डी .एस. भाटिया हे या सिनेमाचे निर्माते असून भरत शाह हे या सिनेमाचे प्रेझेंटर आहेत. तर भावेश भट्ट आणि मयूर पटेल हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत.
या सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्याला बॉलिवूड मधील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. या सिनेमातील सुमधुर गाण्यांना संगीत दिग्दर्शक विष्णु नारायण, नरेश कारवाल, तन्मय पाहवा, रोबी बादल यांनी संगीत दिलंय. तर या सिनेमातील गाणी सोनू निगम, दिलेर मेहंदी, मधुश्री, प्रथमेश, कल्पना, जुबिन गर्ग आणि गरिमा याग्निक यांनी गायली आहेत. अनेक प्रसिद्ध गायक या चित्रपटासाठी एकत्र आल्याने अनेक सुमधुर गाणी रसिकांना या चित्रपटात ऐकायला मिळणार आहेत.
या रोमँटिक सिनेमात सलमान यूसुफ खान, अक्शा परदासनी, कश्यप, मनोज जोशी, नवनी परिहार, सोनिका गिल, राजेश शर्मा, सुनील पाल, आशिष गोखले, सागरिका, हिया सिंह, गार्गी पटेल, बाल कलाकार नम्र दीवानी आणि शक्ति कपूर यांच्या भूमिका आहेत. सलमान युसुफ खान डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमामुळे नावारूपाला आला. या  डान्स रिअॅलिटी शो नंतर तो अनेक रिअॅलिटी शोमध्ये झळकला. एक चांगला डान्सर म्हणून त्याला ओळखले जाते. 


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :