क्रिती म्हणते,‘मी फिट अ‍ॅण्ड फाईन’

सततच्या चौकशांना कंटाळलेल्या क्रितीला अखेर सोशल मीडियावरच ती अगदी ठणठणीत असल्याचा खुलासा करावा लागला. मी अगदी ठणठणीत आहे, असे ट्विट तिने केले.

क्रिती म्हणते,‘मी फिट अ‍ॅण्ड फाईन’
Published: 13 Nov 2016 09:25 PM  Updated: 13 Nov 2016 03:55 PM

मी एकदम फिट अ‍ॅण्ड फाईन आहे, हे क्रितीला अलीकडे सगळ्यांना सांगत फिराव लागतयं. कारण काय तर तिच्या तब्येतीविषयी पसरलेली एक अफवा. होय, क्रितीची तब्येत बरी नसल्याची अफवा सध्या सोशल मीडियावर पसरलीयं. मग काय? सहकलाकार आणि चाहत्यांनी क्रितीच्या तब्येतीची चौकशी करायला सुरूवात केली. सततच्या चौकशांना कंटाळलेल्या क्रितीला अखेर सोशल मीडियावरच ती अगदी ठणठणीत असल्याचा खुलासा करावा लागला. मी अगदी ठणठणीत आहे, असे ट्विट तिने केले.  

अभिनेत्री क्रिती सॅनन ही सध्या ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. लखनौ येथे शूटिंग करत असताना ती बेशुद्ध झाली आणि सेटवरच खाली पडली अन् तिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, अशी वार्ता वाऱ्यासारखी ‘बी टाऊन’मध्ये पसरली.  ही बातमी धादांत खोटी असल्याचे नंतर क्रितीने स्पष्ट केले. ‘ चाहत्यांनो, ही खोटी बातमी आहे...माझ्या तब्येतीची काळजी करणाऱ्या  मी सांगू इच्छिते की,  मी एकदम फिट अ‍ॅण्ड फाईन आहे,’असे ती म्हणाली.

आश्विन अय्यर तिवारी दिग्दर्शित ‘बरेली की बर्फी’ चित्रपटात राजकुमार राव आणि आयुषमान खुराना यांच्यासह क्रिती सॅनन ही देखील दिसणार आहे. या चित्रपटाकडून तिला प्रचंड अपेक्षा आहेत. त्यामुळे ती भूमिकेला परिपक्व करण्यासाठी मेहनत घेताना दिसतेय. ‘दिलवाले’ मधील तिचा अभिनय रसिकांना चांगलाच आवडला होता. त्यात तिच्यासोबत शाहरूख खान, काजोल, वरूण धवन अशी तगडी स्टारकास्ट होती. पण या आगामी चित्रपटात तिलाच अभिनयाचे ‘चार चाँद’ लावण्याची गरज आहे. पाहूयात...ही बर्फी चाहत्यांना  किती आवडते ती!













पब्लिसिटीसाठी इशा गुप्ता करतेय का बोल्ड फोटोशूट?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :