Koffee With Karan Season 5: प्रियांका चोप्रा कोणाला म्हणाली हॉलीवूडचा सलमान खान?

करण जोहरच्या वादग्रस्त सेलिब्रेटी चॅट शोमध्ये प्रियांका चोप्राने तिच्या खासगी व प्रोफेशनल आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. योवळी तिने ‘बेवॉच’ को-स्टार ड्वेन जॉन्सनला हॉलीवूडचा सलमान खान म्हटले. ते का? हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Koffee With Karan Season 5: प्रियांका चोप्रा कोणाला म्हणाली हॉलीवूडचा सलमान खान?
Published: 23 Jan 2017 11:20 AM  Updated: 23 Jan 2017 11:20 AM

‘क्वांटिको’मध्ये प्रियांका चोप्राची अमेरिकन अ‍ॅक्सेंट इंग्लिश ऐक ल्यानंतर तिच्या तोंडून हिंदी व भारतीय बोलीतील इंग्रजी ऐकण्यासाठी आतूर झालेल्या चाहत्यांसाठी ‘कॉफी विथ करण’चा लेटस्ट एपिसोड म्हणजे पर्वणीच ठरला. या वादग्रस्त सेलिब्रेटी शोवर ती येणार का याबाबत साशंकता होती.

आपली ‘देसी गर्ल’ प्रियांका जरी हॉलीवूडमध्ये गाजत असली तरी ती मनाने पूर्ण देसी आहे याचा प्रत्यय या भागात आला. यावेळी तिने तिचे हॉलीवूड करिअर, तिकडची लाईफस्टाईल, आगामी इंग्रजी चित्रपट ‘बेवॉच’ याविषयी भरभरून सांगितले. सुरुवातीलाच करणने तिचा ‘खासपद्धतीने’ परिचय देऊन स्वागत केले.

ALSO READ: प्रियांका आणि टॉम हिडलस्टन प्रेमात?

‘बेवॉच’ को-स्टारबद्दल ती म्हणाली की, ड्वेन जॉन्सन (द रॉक) हा हॉलीवूडचा सलमान खान आहे. दुसऱ्यांच्या भावनांचा आणि मतांचा आदर कसा करावा हे त्याच्याकडून शिकले पाहिजे. तो माणूस म्हणून कसा आहे याची कल्पना जर करायची असेल तर तो एकदम सलमानसारखा आहे. अत्यंत सभ्य आणि आपल्या कुटुंबाशी जोडलेला आहे. तिकडचा तो ‘भाईजान’ आहे.  कदाचित तो भारतात प्रोमोशनसाठीदेखील येऊ शकतो.

priyank aon kWK

‘हॉलीवूड वि. बॉलीवूड’ अशी चर्चा चालणार असे वाटत असतानाच करणने नेहमीप्रमाणे खासगी गोष्टी विचारण्यास सुरूवात केली. मध्यंतरी तिचे नाव हॉलीवूड अ‍ॅक्टर आणि टेलर स्विफ्टचा एक्स-बॉयफ्रेंड टॉम हिडलस्टनशी जोडण्यात आले होते. एमी अवॉर्ड्समध्ये दोघांनी एकत्र पुरस्कार प्रदान केला होता. त्यानंतर पार्टीतही दोघांची बॉण्डिग जुळल्याची चर्चा होती. यावर खुलासा करत प्रियांका म्हणाली की, ‘टॉम आणि मी केवळ दहा मिनिटे एकत्र होतो. पण त्याचा जागतिक मुद्दा बनवण्यात आला. आमच्यात तसे काहीच नाही.’

दीपिकासोबतच्या तुलनेतविषयी ती सांगते की, ‘दीपिका हॉलीवडूमध्ये आल्यामुळे मला वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. उलट भारतीय कलाकार जास्तीत जास्त संख्येने आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकत आहे म्हटल्यावर मला आनंदच वाटतो. दीपिका, सोनमचा मला त्यामुळे अभिमानच वाटतो. फक्त बॉलीवूडविषयी त्या लोकांचा जो गैरसमज आहे तो आपण दूर करू शकलो तर चांगले होईल. भारतीय म्हणून काही ठराविक भूमिकाच मिळतात असे होऊ नये म्हणजे झाले.’

 ALSO READ: सलग दुस-या वर्षीही पीपल चॉईस अवॉर्ड जिंकणारी प्रियंका ठरली पहिली भारतीय अभिनेत्री


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :