करिअरच्या भीतीमुळे कॅटरिना कैफ झाली सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्ह!!

कॅटरिना कैफने इन्स्टाग्राम डेब्यू केला आणि तिचे सगळे चाहते सुखावले. पण कॅटच्या या इन्स्टाग्राम डेब्यूला कोण जबाबदार होते, हे आता इतक्या दिवसांनी समोर आले आहे. होय, कॅटच्या या इन्स्टाग्राम डेब्यूसाठी करण जोहर जबाबदार आहे.

करिअरच्या भीतीमुळे कॅटरिना कैफ झाली सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्ह!!
Published: 09 May 2017 10:23 AM  Updated: 09 May 2017 10:23 AM

कॅटरिना कैफने इन्स्टाग्राम डेब्यू केला आणि तिचे सगळे चाहते सुखावले. अगदी काही तासांत कॅटरिनाला हजारो फॉलोअर्स मिळालेत. इन्स्टाग्रामवर कॅटचे जोरदार स्वागत झाले. पण कॅटच्या या इन्स्टाग्राम डेब्यूला कोण जबाबदार होते, हे आता इतक्या दिवसांनी समोर आले आहे. होय, कॅटच्या या इन्स्टाग्राम डेब्यूसाठी करण जोहर जबाबदार आहे. करणच्याच सांगण्यावरून कॅट इन्स्टाग्रामवर आली. आॅनलाईन दुनियेत आली नाहीस, तर तुझे करिअर संपले म्हणून समज, हे करण कॅटच्या गळी उतरवण्यात करण यशस्वी झाला. करणचे हे शब्द असे काही परिणाम करून गेलेत की, कॅट इन्स्टाग्रामवर आली. फेसबुकवर आली. खरे तर कॅट अतिशय मितभाषी आणि आपल्याच कोशात वावरणारी अभिनेत्री. याचमुळे सोशल मीडिया येणे तिने टाळले होते. पण करणच्या शब्दांनी कॅटला खाडकन जाग आली आणि ती सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाली. इन्स्टाग्रामवर आल्यानंतर करण जोहर, अक्षय कुमार, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, रणवीर सिंह अशा अनेकांनी कॅटचे स्वागत केले. प्रियांका चोप्रानेही कॅटला वेलकम केले. 

ALSO READ : कॅटरिना कैफचा पिच्छा पुरवणे ‘या’ चाहत्याला पडले महाग!

सोशल मीडिया आजघडीला प्रसिद्धीचे सगळ्यात प्रभावी माध्यम बनले आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या माध्यमाद्वारे आपल्या चाहत्यांशी थेट संपर्कात राहू शकतात. करिअरसाठी याचा फायदा निश्चितच होतो. उशीरा का होईना कॅटला ही गोष्ट कळली. आता तर कॅट इन्स्टाग्रामवर चांगलीच रमली आहे. तिच्या रोजच्या पोस्टवरून त्याचा अंदाज येऊ शकतो. निश्चितपणे कॅटच्या या सोशल मीडिया डेब्यूसाठी आपण सगळ्यांनी करणचे आभार मानायला हवेत. आमच्या कमेंट बॉक्समध्ये जावून तुम्ही याबद्दलच्या तुमच्या भावना व्यक्त करू शकता. शिवाय कॅटला शुभेच्छा अन् करणला धन्यवादही देऊ शकता.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :