​ कंगना राणौतला करण जोहरने केले सावध! पण, कुणापासून आणि का?

सध्या कंगनाचा एआयबीसोबत केलेला एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. अर्थात असे असूनही आत्तापर्यंत बॉलिवूडमधील कुणीही कंगनाच्या या बेधडक व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलेली नव्हती. पण आता करण जोहर मात्र यावर बोलला आहे.

​ कंगना राणौतला करण जोहरने केले सावध! पण, कुणापासून आणि का?
Published: 13 Sep 2017 11:10 AM  Updated: 13 Sep 2017 11:10 AM

कंगना राणौत सध्या भलतीच चर्चेत आहे. कंगनाचा ‘सिमरन’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतो आहे. पण त्याआधी विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमुळे कंगना चर्चेत आली आहे. अलीकडे कंगना एका टीव्ही शोमध्ये आली आणि हृतिक रोशनपासून आदित्य पांचोली ते करण जोहरपर्यंत सगळ्यांनाच तिने आरोपीच्या पिंजºयात उभे केले. आता कंगनाने एआयबीसोबत केलेला एक व्हिडिओही अशाच वादाच्या केंद्रस्थानी सापडला आहे.The bollywood diva song नावाच्या या व्हिडिओत ‘चीटियां कलाइयां’ या लोकप्रीय गाण्याचे पॅरोडी व्हर्जन दिसते. अर्थात ‘चीटियां कलाइयां’च्या चालीवरचे गाणे या व्हिडिओत ऐकायला मिळते. या गाण्यात नेपोटिझमवर भाष्य करण्यात आले आहे. केवळ इतकेच नाही तर ‘कॉज आय हॅव व्हजायना’ असे बेधडक बोल कंगना या गाण्यात बोलताना दिसतेय.  बॉलिवूडमध्ये नायक-नायिकांच्या वयांमध्ये असलेल्या फरकावरही यात भाष्य करण्यात आले आहे. सध्या कंगनाचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. अर्थात असे असूनही आत्तापर्यंत बॉलिवूडमधील कुणीही कंगनाच्या या बेधडक व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलेली नव्हती. पण आता करण जोहर मात्र यावर बोलला आहे.


‘डिअर टॅलेंट, मला वाटते की तू अतिआत्मविश्वास आणि भ्रमापासून दूर राहावे. ते कायम तुझ्याविरोधात कट रचताहेत. तुला हे दिसत नाही का?’ असे tweet करणने केले आहे. या tweetमध्ये करणने कंगनाचे नाव घेतले नाही. पण त्याचा इशारा कंगनाकडेच आहे, हे स्पष्ट आहे. पण करण कंगनाला कुणापासून सावध करू इच्छितो, हे मात्र कळायला मार्ग नाही.
कंगना व करणचा वाद तुम्हाला ठाऊक आहेच. करणवर कंगना नेपाटिझमचा आरोप लावून चुकली आहे. इतकेच नाही तर त्याला ‘मुव्ही माफिया’म्हणून मोकळी झाली आहे. मला करणच्या चित्रपटात अजिबात काम करायचे नाही. मी करणसोबत एक चित्रपट केला होता अन् तोच माझ्या करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप होता, असेही कंगना बोलून गेली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर करण व कंगनामध्ये सध्या तणाताणी सुरू आहे. याचाच पुढचा अध्याय म्हणजे करणचे हे ताजे टिष्ट्वट आहे.

ALSO READ : Don't Miss : ​गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या ‘हटके’ प्रश्नांना, कंगना राणौतचे ‘हटके’ उत्तर!!

आता करणच्या या tweetला कंगना कसे उत्तर देते, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. शेवटी काय तर कंगनाच्या बोलायची देरी की, बातमी झालीच. सो, वेट अ‍ॅण्ड वॉच!!


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :