दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या आगामी ‘इंदू सरकार’ या चित्रपटाला विरोध वाढतच असल्याचे दिसून येत आहे. काल पुण्यात कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर आज नागपूर येथेही मधुर भांडारकर यांची पत्रकार परिषद उधळून लावली आहे. कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत पत्रकार परिषद होऊ दिली नाही. अखेर संतापलेल्या मधुर भांडारकर यांनी कॉँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे.
मधुर भांडारकर यांनी आपला राग व्यक्त करताना ट्विटच्या माध्यमातून लिहिले की, ‘राहुलजी, पुण्यानंतर आजपण पत्रकार परिषद रद्द करावी लागली. कॉँग्रेसच्या गुंडगिरीला तुमचे समर्थन आहे काय? देशात मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय? ’ नागपुरात मधुर भंडारकर हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये थांबले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना हे समजताच कार्यकर्ते हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये धडकले. त्याचवेळी मधुर भांडारकर पोलीस सुरक्षा व्यवस्थेत विमानतळावर रवाना झाले. भांडारकरच्या मागोमाग काँग्रेस कार्यकर्तेही विमानतळाकडे रवाना झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांचा मधुर भांडारकर यांच्या अंगावर शाई फेकण्याचा इरादा असल्याचेही समोर आले आहे.
काल पुण्यात एका हॉटेलमध्ये चित्रपटाची पत्रकार परिषद सुरू असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा घातला होता. आता नागपुरातही भांडारकरची पत्रकार परिषद काँग्रेस कार्यकर्त्यांनी उधळून लावली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसून आंदोलन केले गोंधळामुळे पत्रकार परिषद रद्द करावी लागली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मधुर भांडारकर यांनी म्हटले की, नागपुरात ‘इंदू सरकार’ या चित्रपटासंदर्भात पत्रकार परिषद होणार होती. त्याचवेळी मला फोन आला की, तुम्ही याठिकाणी पत्रकार परिषद घेऊ शकणार नाही. कारण येथेही तुम्हाला विरोध केला जात आहे. काही वेळानंतरच सुमारे १५० लोक माझ्या आणि चित्रपटाविरोधात नारेबाजी करीत होते. ज्या पद्धतीने पुण्यात विरोध केला गेला, अगदी तसाच विरोध नागपुरातही केला गेला.Dear @OfficeOfRG after Pune I have 2 cancel today's PressCon at Nagpur.Do you approve this hooliganism? Can I have my Freedom of Expression? pic.twitter.com/y44DXiOOgp
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) July 16, 2017
पुढे बोलताना मधुर भांडारकर यांनी म्हटले की, ‘राहुल गांधींना मी खूपच विन्रमपणे विचारले की, देशात मला अभिव्यक्ती स्वातंत्र नाही काय? मी सुरुवातीपासूनच सांगत आलो की, माझा हा चित्रपट ७० टक्के काल्पनिक आहे. हा चित्रपट आणीबाणीवर नाही शिवाय डॉक्युमेंट्रीही नाही. चित्रपटात केवळ एका इंदू नावाच्या मुलीची कथा आहे. ही कथा तेव्हाची आहे, जेव्हा देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती.Maharashtra: Congress workers protest against Madhur Bhandarkar's film #InduSarkar in Nagpur pic.twitter.com/IGKNvF1B1B
— ANI (@ANI_news) July 16, 2017