​हृतिक रोशनला ex-wife सुजैन खान हवी जवळ! खरेदी केला फ्लॅट!!

घटस्फोट झाल्यानंतरही आपली मुले व एक्स वाईफ एक्स वाईफ सुजैन खान आपल्या जवळ राहावीत, असे हृतिक रोशनला वाटतेय. कदाचित याचमुळे हृतिकने या तिघांसाठी आपल्या घराजवळ एक फ्लॅट खरेदी केला आहे.

​हृतिक रोशनला ex-wife सुजैन खान हवी जवळ! खरेदी केला फ्लॅट!!
Published: 19 May 2017 11:49 AM  Updated: 19 May 2017 11:49 AM

हृतिक रोशन व त्याची एक्स वाईफ सुजैन खान यांना विभक्त होऊन जवळपास दोन वर्षे झालीत. मात्र या दोन वर्षांत त्यांच्यातील मैत्रीच नाते त्यांनी प्राणपणाने जपले. मुलांसाठी म्हणा किंवा एकमेकांप्रती अद्यापही असलेल्या प्रेम व आदरापोटी म्हणा दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झालेत. काही दिवसांपूर्वी हृतिकने एका मुलाखतीत सुजैनबद्दलचे त्याच्या मनातले प्रेम आटलेले नाही, हे अप्रत्यक्षपणे बोलून दाखवले होते. सुजैनपासून विभक्त झाल्यानंतर मी अद्याप लग्न वा कुणाशी डेट करण्याच्या मूडमध्ये नाहीय, असे त्याने सांगितले होते. सोबतच सुजैननेही ती आणि हृतिक अद्यापही चांगले मित्र असल्याचे म्हटले होते. हृतिक आणि सुजैन या दोघांची मुले त्यांना सांधणारा दुवा आहे. घटस्फोटानंतर दोन्ही मुले रिहान व रिधान आपल्या आईसोबत राहतात. पण  हृतिकला या तिघांची कमतरता जरा अधिकच जाणवू लागली आहे. कदाचित याचमुळे हृतिकने या तिघांसाठी आपल्या घराजवळ एक फ्लॅट खरेदी केला आहे.

हृतिक अपर जुहूत राहतो. याच भागात त्याने हा फ्लॅट खरेदी केला आहे. हृतिकच्या घरापासून हा फ्लॅट केवळ १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. हृतिकचे आईवडिल त्याच्या घरापासून खूप जवळ राहतात. सुजैनचे आईवडिलही या भागात अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असतात. केवळ सुजैन हृतिकपासून वेगळी झाल्यावर अंधेरीतील एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होती. आता ती सुद्धा हृतिकच्या घराजवळ शिफ्ट होईल, असे दिसतेय. घटस्फोट झाल्यानंतरही आपली मुले व एक्स वाईफ आपल्या जवळ राहावीत, असे हृतिकला वाटतेय, असाच याचा अर्थ काढायला हवा.

ALSO READ : ​हृतिक व सुजैन पुन्हा येणार का एकत्र?

तूर्तास हृतिकने कबीर खानचा एक अ‍ॅक्शन चित्रपट साईन केला आहे. ए. आर. मुरूगदास यांच्या ‘कत्थी’च्या रिमेकसाठीही हृतिकचे नाव फायनल झाल्याचे कळतेय.


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :