सनी देओलकडून मिळाली प्रेरणा; पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी सोडून देत बनला आयपीएस!

मनोज कुमार रावत यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करीत आयपीएसचा दर्जा मिळवला. परंतु त्यांना सनी देओलकडून प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात.

सनी देओलकडून मिळाली प्रेरणा; पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी सोडून देत बनला आयपीएस!
Published: 02 May 2018 05:42 PM  Updated: 02 May 2018 05:42 PM

मनोज कुमार रावत यांनी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या यूपीएसी ( UPSC Civil Services Examination 2017) परीक्षेत देशात ८२४ वी रॅँक मिळविली. आता मनोज कुमार लवकरच आयपीएस अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. २९ वर्षीय मनोज सुरुवातीला एक पोलीस कॉन्स्ट्रेबल म्हणून कार्यरत होते. त्यांनी २०१३ मध्ये ही नोकरी सोडून दिली. कारण लहानपणापासूनच पोलीस अधिकारी बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. 

यावेळी मनोज सांगतात की, मी एक सर्वसामान्य परिवारातून आहे. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच हे जाणून होतो की, मला संधींचा शोध घ्यायचा आहे. याचदरम्यान, माझ्या भावानंतर मलाही पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर मी निर्धार केला की, मला पुढे जायचे आहे. मी नागरी सेवा परीक्षा दिल्या. पुढे २०१४ मध्ये मला कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर सीआयएसएफमध्ये नोकरी मिळाली. ही नोकरीदेखील मी सोडली. त्यानंतर मी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. 
 

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol) on


याविषयी मनोज सांगतात की, पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी सोडल्यानंतर मला २०१४ मध्ये कनिष्ठ लिपिकाची नोकरी मिळाली. याचदरम्यान माझी सीआयएसएफमध्ये निवड झाली. मात्र मी हीदेखील नोकरी सोडली. कारण मला यूपीएससीसाठी पुरेसा वेळ हवा होता. मनोज रावत सांगतात की, यूपीएससीची तयारी करताना मी अभिनेता सनी देओल याच्यापासून खूपच प्रेरित होतो. जेव्हा मी सनी देओलचा ‘इंडियन’ हा चित्रपट बघितला तेव्हाच माझ्या मनात आयपीएस बनण्याची इच्छा निर्माण झाली.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :